Homeक्राईमसुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

Newsworldmarathi Solapur : सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी आत्महत्या केली.

सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या घरी असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली.

गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने त्यांच्या स्वतःच्या वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

अहवालांनुसार, डॉ. वळसंगकर हे काही दिवसांपासून तणावाखाली होते, मात्र त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डॉ. वळसंगकर हे सोलापूरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित न्यूरोसर्जन होते. त्यांच्या जाण्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते सोलापूरमधील वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती, तसेच लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनकडून एमआरसीपी ही पदवीही मिळवली होती. त्यांचे पुत्र डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली दोघेही न्यूरोलॉजिस्ट आहेत.

डॉ. वळसंगकर यांचे कार्य हे समर्पण, गुणवत्ता, आणि सेवाभावाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने सोलापूर व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी सहज भरून निघणे कठीण आहे.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सुन आणि मुली असा परिवार आहे.सध्या पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments