Homeक्राईमBeed crime : बाबासाहेब आगे खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीच्या पत्नीने सांगितले...

Beed crime : बाबासाहेब आगे खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीच्या पत्नीने सांगितले सत्य

Newsworldmarathi Beed : बाबासाहेब आगे यांच्या खून प्रकरणात आता एक वेगळं आणि धक्कादायक वळण समोर आलं आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व भाजपचे बूथ विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची हत्या १५ एप्रिल रोजी भरदिवसा करण्यात आली होती. ही घटना स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयाजवळ घडल्याने परिसरात खळबळ माजली होती. आरोपी नारायण शंकर फपाळ याने पुढाकार घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत, “मीच हत्या केली” अशी कबुली दिली होती.

Advertisements

नवीन वळण काय आहे?
सुरुवातीला ही घटना राजकीय द्वेषातून घडल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर समोर आलेल्या माहितीप्रमाणे, नारायण फपाळ याला आपल्या पत्नीवर आणि बाबासाहेब आगे यांच्यावर ‘अनैतिक संबंधाचा’ संशय होता. याच संशयातून त्याने ही हत्या केली, असे समजले जात आहे.

Advertisements

आरोपीच्या पत्नीने सांगितले खरं कारण
आता आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने हत्येचे खरे कारण सांगितले असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचे व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता. यातूनच हा प्रकार घडला, असे फपाळच्या पत्नीने म्हटले आहे. तर बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते, असे देखील या महिलेने सांगितले आहे.

आरोपीच्या पत्नीनेही काही महत्त्वाचे खुलासे केले असून, तिचे जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. यामुळे हा खून वैयक्तिक सूडातून झाला की यामागे अजून काही मोठं षडयंत्र आहे, हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात चालू आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments