Newsworldmarathi Dharashiv : लग्नसमारंभ म्हटलं की गडगडाट वाजंत्री, नाच-गाणी, आणि दमदार वरात यांचीच तर मजा असते. पण या सगळ्यात एक शेतकरी मात्र चांगलाच चर्चेत आला आहे — कारण त्याच्या स्वागताची स्टाईलच काहीशी वेगळी आणि भन्नाट होती!
या शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नात वाजतगाजत वरात आणण्याऐवजी यांच्याच लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आल्याने पंचक्रोशीत या फिल्मी स्टाईल लग्नाची चर्चा झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने आपल्या मुलाची हौसच पूर्ण केली आहे.
गावकऱ्यांनी कौतुकाने म्हटलं – “लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही!” या हटके स्वागतामुळे फक्त नववधूच नव्हे, तर पाहुणे आणि सोशल मीडियावरचे युजर्सही भारावून गेलेत.
धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची हौस म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी थेड हेलीकॉप्टर मागवला आहे.
भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ही हेलीकॉप्टरमधून मिरवणूक काढाली होती, असे त्यांनी स्वतः सांगितले. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. आपली हौस भागवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढली. यामुळे याची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
Recent Comments