Homeक्राईमखळबळजनक...! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार

खळबळजनक…! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार

Newsworldmarathi Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्राच्या घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जणांच्या टोळक्याने उचलून नेत त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) मध्यरात्री केडगावमध्ये बाह्यवळण रस्त्यावरील नेप्ती मार्केटजवळील मोकळ्या जागेत घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करताना निर्दयी टोळक्याने त्याचे व्हिडिओ काढले. तसेच तिथे त्याला मारहाण करीत नग्न करून सामूहिक बलात्कार केला. याला जिवंत सोडून नका असे म्हणत कापडी पंचाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथनगर येथील रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) यांच्यासह अन्य सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत पीडित युवकाने तीन दिवसांनंतर गुरुवारी (दि. १७) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ वादातून १२ जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला मित्राच्या घरातून उचलून नेले. त्याला मारहाण करीत अनैसर्गिक अत्याचार केला. बेशुद्ध अवस्थेत मेला म्हणून सोडून दिल्याने सुदैवाने तो वाचला. या घटनेचं अधिक तपास कोतवाल पोलीस करत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments