Newsworldmarathi Beed : बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीक्षेत्र भगवानगडावर नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण क्षण पाहायला मिळाला. या कार्यक्रमात भाजप नेत्या, मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस एकत्र मंचावर आले. विशेष म्हणजे, सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करत आदरपूर्वक त्यांचे स्वागत केले.
या अध्यात्मिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस एकत्र येताच, राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलाच ऊत आला. अनेकांनी या उपस्थितीचा राजकीय अर्थ लावायला सुरुवात केली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या भगवान गडाशी संबंधित आठवणी सांगितल्या. त्या म्हणाले, गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव मोठे करण्याची माझी ऐपत नाही. परंतु हे नाव लहान होऊ देणार नाही. जीवनात कोणाला दुखवणार नाही. इतकेच मागणे मी भगवान बाबांकडे करते, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
नारळी सप्ताहाची थोर परंपरा आहे. येथून सर्व वारकरी संप्रदायचा जन्म होतो. वामन भाऊंचा आदरयुक्त धाक आहे. भगवान बाबांच्या जीवनात सर्व वैभव आणि संपत्ती होती. त्यानंतर त्यांनी सर्व सुखाचा त्याग करुन ईश्वराच्या मार्गाने जाण्याची वैभवशाली परंपरा सुरु केली. ज्याच्या कार्मात वैभव आहे, तोच जीवनात पुढे जाऊ शकतो, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले


Recent Comments