Newsworldmarathi Nagar: किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींनी चक्क जावयालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गणेश बाजीराव ब्राम्हणे (वय-३१) यांनी सोनाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गणेश दिलीप गव्हाणे, सचिन दिलीप गव्हाणे, दिलीप महादू गव्हाणे (सर्व रा. हिंगणी दुमाला ता. श्रीगोंदा) राजू जाधव (रा. चेडगाव, ता. राहुरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ब्राम्हणे हे आपल्या घरी असताना त्या ठिकाणी आरोपी गणेश गव्हाणे, सचिन गव्हाणे, दिलीप गव्हाणे आणि राजू जाधव हे आले. आणि तुला आमच्या मुलीला नीट नांदविता येत नाही का? असा जाब विचारला. यावर फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना लोखंडी फायटर तसेच लोखंडी पाईपने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान वडील भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांनाही लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. आमच्या नादी लागला तर एकेकाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सोनाई पोलीस करत आहेत.
Recent Comments