Newsworldmarathi Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. “तुमच्या मुलाला जास्त मार्क्स टाकून वर्गात पहिला नंबर आणून देतो, त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल….!” असं आमिष दाखवत एका महिला पालकावर दोन शिक्षकांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
घडली आहे. ही घटना मलकापूर शहरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून, वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्हीं आरोपी शिक्षकांना अटक केली आहे. समाधान इंगळे आणि अनिल थाटे अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मलकापूर शहरातील नामांकित नूतन विद्यालयातील दोन शिक्षकांनी एका महिला पालकाला आपल्या जाळ्यात ओढत हे
कृत्य केलं आहे. तुझ्या मुलाला आम्ही भरपूर मार्क्स देऊन नेहमीसाठी वर्गात पहिला नंबर आणून देऊ.., त्यासाठी आम्हाला खुश करावे लागेल…! असं म्हणत संधी साधून वारंवार बलात्कार केला आहे.
दरम्यान, दोन्हीं आरोपीना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Recent Comments