Homeक्राईम१७ वर्षीय तरुणाची ५ जणांकडून गळा चिरून हत्या; नांदगाव परिसरात खळबळ

१७ वर्षीय तरुणाची ५ जणांकडून गळा चिरून हत्या; नांदगाव परिसरात खळबळ

Newsworldmarathi Nandgao: नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातुन एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत १७ वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री वखारी परिसरात घडली आहे. रवींद्र उर्फ मुन्ना दिपक आहिरे (वय-१७, रा. बोधे.) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी रवींद्र अहिरे याचे वडील दिपक आहिरे (वय-४२) यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत चार संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाखारी शिवारातील जंगलात या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.

रवींद्र ऊर्फ मुन्ना आहिरे यास पूर्ववैमनस्यातून आकाश शरद सोनवणे, ऋषिकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे, वींद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी साकुरी झाप, ता. मालेगाव) यांनी संगनमत करून ठार मारण्याचा कट रचून त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच त्याचा गळा धारधार शस्त्राने कापून त्यास तेथे सोडून पळून गेल्याचे मुलाच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments