धक्कादायक…! मामाने मोबाईल घेतल्याच्या रागातून तरुणीने मारली इमारतीवरून उडी
मुंबई : मुंबईच्या डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मामाने मोबाईल हातातून काढून घेतल्याच्या रागातून एका महाविद्यालयीन तरुणीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी डोंबिवलीमध्ये घडली आहे. समीक्षा वड्डी ( वय-२०) असं आत्महत्या केल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश प्रधान यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रधान हे काटई-बदलापूर पाइपलाइन रोड येथील खोणीगाव येथे एका इमारतीत कुटुंबासह राहतात. प्रधान यांची भाची असलेली समीक्षा मंगळवारी रात्री मोबाईलवर बराच वेळ बोलत होती. तिने अभ्यास करावा म्हणून मामाने तिच्या हातातील मोबाईल काढून घेतला. तिचा मोबाईल काढून घेतल्याने रागाच्या भरात समीक्षा गॅलरीत गेली आणि काही कळायच्या आत तिने तडक ११व्या मजल्यावरून उडी मारली
ती खाली पडताच मोठा आवाज झाला. त्यावेळी इमारतीतील रहिवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्वरित खाली धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या समीक्षा हिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Recent Comments