Newsworldmarathi Ahilyanagar: शेतकऱ्यांपाठोपाठ आता लाडक्या बहिणीकडूनही राज्यातील महायुती सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी येथील तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला आहे. महायुती सरकारने निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिले. त्यांना २१०० रुपये दर महिना अनुदान देऊ. परंतु, सत्तेत निवडून येताच महायुती सरकारने २१०० रुपये तर दिले नाही.
किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपयांचे अनुदानही बंद केले. आता फक्त ५०० रुपये प्रती महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना १५०० नाही, आता ५०० रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार करण्यात आली.
शेतकरी सुनीता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात फसवणूक करून विश्वासघात केल्याची तक्रार दिली आहे. यावेळी कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी केल्या.
तक्रार अर्जात नेमकं काय?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने २१०० रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे १५०० रुपये अनुदानही बंद केले.
आता फक्त ५०० रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच, लाडक्या बहिणींना २१०० रुपये पणं नाही, अन् १५०० रुपये पणं नाही. आता ५०० रुपये देऊन आमची फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी ५ मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.


Recent Comments