Homeपुणेसंविधानाच्या अस्तित्वासाठी वकील वर्गावर जबाबदारी अधिक - तिवारी

संविधानाच्या अस्तित्वासाठी वकील वर्गावर जबाबदारी अधिक – तिवारी

Newsworld Pune : देशात कसोटीच्या क्षणी, कायद्याची बूज राखण्यासाठी जागरूक व संघर्षरत राहणे ही काळाची गरज असुन, ‘संविधान व लोकशाही’च्या अस्तित्वासाठी वकील वर्गा कडून अपेक्षा अधिक असल्याने, कायद्याचे संरक्षक म्हणून वकील वर्गावर जबाबदारी अधिक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारीयांनी केले. अध्यक्ष’स्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते.

Advertisements

“राष्ट्रीय वकील दिना”च्या व काँग्रेसच्या लीगल सेल’च्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे औचित्याने सदर कार्यक्रमाचे संयोजन पुणे काँग्रेसच्या लीगल सेल’ने केले होते. महाराष्ट्र प्रदेश इंटक’चे पदाधिकारी तसेंच प्रदेश सचिव ऍड फैयाज शेख, तसेच पुणे शहर कॅांग्रेस लिगल सेल चे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत पाटील यांच्या जन्मदिन केक कापून व वकीलांचा सत्कार करून “राष्ट्रीय वकील दिन” साजरा करण्यात आला..!

या प्रसंगी प्रदेश काँग्रेस लीगल सेल चे उपाध्यक्ष ऍड. शाहिद अख्तर शेख, ऍड. अनिल कांकरिया ऍड अयुब पठाण सि आय डी ॲड काळेबेरे, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मेहबूब नदाफ यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी ॲड विद्या पेळपकर, ॲड. रशिदा सय्यद, ॲड. डिसूझा, ॲड. अतुल गुंड पाटील, ॲड. राजाभाऊ चांदेरे, ॲड. चव्हाण, ॲड. सतीश कांबळे, ॲड. बलकवडे, ॲड भुंडे, ॲड सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बावणे इ वकील मंडळी मोठ्या संख्येने ऊपस्थित होती.. तसेच राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य तसेच जेष्ठ काँग्रेसजन बाळासाहेब मारणे, रामचंद्र शेडगे, रमण पवार, सुभाष काळे, राजेश मंजरे, धनंजय भिलारे, सुनील तिखे, विकास दवे, गणेश शिंदे, नरेश आवटे इ उपस्थित होते.सुत्रसंचालन भोला वांजळे यांनी केले तर आभार प्रदर्शन काँग्रेस लीगलचे शहर उपाध्यक्ष ऍड. आरुडे यांनी केले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments