Newsworldmarathi solapur : शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्यात मध्यरात्री भीषण आग लागली. ही घटना शनिवार-सोमवारच्या मध्यरात्री सुमारे 3 वाजता घडली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीच्या धुरामुळे आणि उष्णतेमुळे कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र, जवानांनी जीव धोक्यात घालून तीन जणांना बाहेर काढले.
दुर्दैवाने, या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. आगीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरूच आहेत. मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, प्रशासनाने घटनास्थळी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आहे.


Recent Comments