Newsworldmarathi pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर केला. यंदा निकाल मे महिन्याच्या सुरुवातीलाच जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना इच्छित कॉलेज निवडण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याच्या तयारीत असून, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज्सविषयी माहिती घेणे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
पुण्यातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज्स :
1. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) – आधुनिक शिक्षण सुविधा, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग भागीदारी यावर भर देणारे हे कॉलेज पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासह चांगल्या नोकऱ्यांचे संधी येथे उपलब्ध आहेत.
2. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AIT) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेले हे कॉलेज लष्करी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण देते. शिस्तबद्ध वातावरण आणि देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्धी मिळवलेले हे कॉलेज आहे.
3. भारती विद्यापीठ – एक अभिमत विद्यापीठ असलेले हे संस्थान विविध इंजिनिअरिंग अभ्यासक्रम, व्यावहारिक शिक्षण आणि उद्योगांशी जोडलेले अनुभव देण्यासाठी ओळखले जाते.
4. सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT) – आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम आणि परदेशी विद्यार्थ्यांची उपस्थिती यामुळे हे कॉलेज अग्रगण्य मानले जाते.
5. सीओईपी (College of Engineering Pune) – 1854 मध्ये स्थापन झालेलं हे कॉलेज महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील तिसरे सर्वात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेले हे महाविद्यालय संशोधन आणि गुणवत्ता शिक्षणावर भर देते.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि गुणवत्तेनुसार योग्य कॉलेज निवडून आपले करिअर घडवण्याची संधी या प्रवेश प्रक्रियेमुळे उपलब्ध झाली आहे.


Recent Comments