Newsworldmarathi Pune: राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत आहे. २० मे रोजी एकूण १९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईत सर्वाधिक १५ रुग्ण आढळले असून, पुण्यात १ आणि कोल्हापूरमध्ये ३ रुग्ण सापडले आहेत. यामुळे मे अखेरपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे.
जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण ६,०६६ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १०६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या मुंबईत १०१ रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत ३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ६८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये ५२ रुग्ण सौम्य लक्षणांसह घरी उपचार घेत आहेत, तर १६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
या रुग्णांवर आवश्यकतेनुसार उपचार सुरू असून बहुतेक रुग्ण सात दिवसांच्या कालावधीनंतर डिस्चार्ज होत आहेत. या कालावधीत राज्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकैल्सिमिक सीझर होता, तर दुसऱ्याला कर्करोग होता.
पुण्यात एका रुग्णाची नोंद
पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 87 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या वर्षातील पुण्यात आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र कोणी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.


Recent Comments