Homeबातम्यासांगलीत खळबळ...! आर्थिक वादातून तरुणाची निर्घृण हत्या; तर आरोपीच्या आईची आत्महत्या, नेमकं...

सांगलीत खळबळ…! आर्थिक वादातून तरुणाची निर्घृण हत्या; तर आरोपीच्या आईची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Sangali: सांगलीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संशयिताच्या आईने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विमल शेजुळ असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. ही घटना सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे घडली आहे. या घटनेने सांगली हादरली आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुकटोळी येथे एका तरुणाची पैशांच्या देवाण-घेवाणीतून हत्या केल्याची घटना घडली. . कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाने ही हत्या केली.

दरम्यान, त्याच्या आईला मुलाच्या या भयानक कृत्यामुळे मोठा धक्का बसला. या तरुणाच्या आईने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. कवठेमंकाळ पोलिसांनी तरुणाच्या हत्येप्रकरणात आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली. आर्थिक वादातून ही घटना घडल्याची पोलीस तपासात माहिती समोर आली आहे.

कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वादातून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाची आरोपी सुशांत शेजुळ या तरुणाने डोक्यात दगड घालून हत्या केली. सदर हत्येची बातमी गावात पसरली. संशयित तरुण सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना आपल्या मुलाने हत्या केल्याची बातमी समजली. गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली. या हत्येची गावभर जोरदार चर्चा झाली.

या दोन्ही घटनेची नोंद कवठेमंकाळ पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत, अटक केली आहे. कवठेमंकाळ पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments