Homeपुणेहुंड्यासाठी छळ, नवऱ्याकडून संशय आणि होत्याचं नव्हतं झालं, प्रेमविवाहाचा भयावह शेवट..

हुंड्यासाठी छळ, नवऱ्याकडून संशय आणि होत्याचं नव्हतं झालं, प्रेमविवाहाचा भयावह शेवट..

Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे आत्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीने १६ मे रोजी गळफास घेतल्याचे प्रथम सांगण्यात आले होते, मात्र तिच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि शवविच्छेदन अहवालामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

बी.जे. हॉस्पिटलच्या अहवालानुसार, वैष्णवीचा मृत्यू गळ्यावरील फासामुळे झाला असून, तिच्या शरीरावर धारदार वस्तूने मारहाण केल्याच्या अनेक खुणा आढळल्या आहेत. याआधी २७ नोव्हेंबर २०२३ रोजीही वैष्णवीने छळाला कंटाळून विष घेण्याचा प्रयत्न केला होता.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हे फरार आहेत.

प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यात वैष्णवीने मैत्रिणीला सतत होणारा मानसिक छळ, चारित्र्यावरचे आरोप आणि हुंड्यासाठी होणारी मागणी याबाबत सांगितले आहे. शशांक हगवणे याने वैष्णवीच्या वडिलांकडे २ कोटी रुपये मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पैसे न दिल्यामुळे वैष्णवीला धमकावण्यात आले आणि तिला माहेरी पाठवण्यात आले होते. काही दिवसांनंतर ती पुन्हा सासरी परतली, पण छळ कायम राहिला. अखेर १६ मे रोजी ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments