Newsworldmarathi chandrpur: महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. एकट्या महिला, मुलीला पाहून तिची छेड काढणे, तसेच तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने होत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अशातच आता चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रस्त्याने पायी जात असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शेतात नेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पीडित तरुणीने चिमूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. प्रतीक साटोने (वय-२६) आणि विकी साटोने (वय-२९) तसेच अंकित काकडे (वय-३१) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दरम्यान पीडित तरुणी ही आपल्या आजीच्या घरी पायी चालत जात होती. त्यावेळी तिच्या सोबत ओळख असलेल्या प्रतीक याने तिला दुचाकीवर बसवून घरी सोडण्याचे सांगत लिफ्ट दिली. मात्र, त्याने तिला घरी न सोडता थेट शेतात घेऊन गेला. अन १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी मिळून शेतात नेऊन सामूहिकरीत्या बलात्कार केला.
दोन साथीदारांना बोलावून घेत केला बलात्कार
तरुणीला शेतात घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने आपल्या दोन साथीदारांना शेतात बोलावून घेतले. यात विकी साटोने आणि अंकित काकडे यांना बोलावून तिघांनी मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. सदरची घटना एप्रिल महिन्यात घडली असून, बदनामीच्या भीतीने पीडितेने आतापर्यंत कोणालाही काही एक सांगितले नव्हते. अखेर महिनाभरानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
दोघेजण अटक, तर एक फरार
दरम्यान, तरुणीने अखेर धाडस करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांनी माहिती देत फिर्याद दाखल केली. यानंतर चिमूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रतीक आणि विकीला अटक केली असून, अंकित सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास चिमूर पोलिस करत आहेत.


Recent Comments