Newsworldmarathi Pune : समजाप्रती आपली बांधिलकी जपत इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाने गरजूंसाठी जुने पण वापरण्यायोग्य कपडे संकलन उपक्रम राबवला. गेल्या १० वर्षांपासून हा उपक्रम नियमितपणे वर्षातून दोन वेळा राबवला जातो. यंदाही संघाने कपड्यांचे संकलन करून ते गुड विल इंडिया या सामाजिक संस्थेकडे सुपूर्त केले. ही संस्था हे कपडे आदिवासी, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवते.
संघटनेचे संचालक अनिल रेळेकर यांनी सांगितले की, “या उपक्रमातून केवळ गरजूंची गरज भागते असे नाही, तर सामाजिक संवेदनशीलतेचा सकारात्मक संदेशही समाजात जातो.” समाजसेवेची जाणीव ठेवत संघाचे सदस्य सातत्याने या उपक्रमात सहभागी होत असतात.
या उपक्रमात जयंत पाटणकर, देवदास गरूड, मारुती पाटील, अनिल रेळेकर, बाबूराव कोले, प्रदीप मलशेट्टे, दत्तात्रय साळेकर, हरीश देशमाने, संजय भोसले, किशोर पवार, मोहन कातुलवार, प्रतिमा पिंगळे, प्रफुलता वडके, संजय गोडबोले, शंकर सूर्या, प्रदीप भालेराव, अरुण थोरात, संजीवनी भावसार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संघटनेचा हा उपक्रम इतरांनीही आत्मसात करावा, अशी भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केली आहे. इच्छापूर्ती संघाचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.


Recent Comments