Homeपुणेहगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे किळसवाणे कारनामे उघड, बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढायचा...

हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे किळसवाणे कारनामे उघड, बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढायचा अन्…

Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या सासरकडील मंडळीसोबत दोषी असणाऱ्या निलेश चव्हाणचे पितळ आता उघडं पडलं आहे. हगवणे कुटुंबाप्रमाणे चव्हाण याने देखील आपल्या पत्निचा अमानुष छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर त्याने स्पाय कॅमेराच्या साहय्याने स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे व्हिडीओ काढल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात २०१९ मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल करण्यात आला आहे.

स्वतःच्या बायकोसोबतचे शरीर संबंधांचे स्पाय कॅमेराच्या साहय्याने व्हिडीओ

निलेश चव्हाणचे ३ जून २०१८ मध्ये लग्न झालं. जानेवारी २०१९ मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काही तरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं. त्यावेळी त्याने तिला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळी ही निलेशने तिला उडवाउडवीची उत्तर दिली.

दरम्यान, त्यानंतर तिच्या मनात असलेल्या शंकेचे निरसन करण्यासाठी तिने त्याचा लॅपटॉप उघडला. त्यामध्ये तिला त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिच्या निदर्शनास आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास नेहमी भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले आहेत. हा सर्व प्रकार लक्षात घेत तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी २०१९ मध्ये पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

निलेश चव्हाणवर पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा दाखल
वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा गुन्हा चव्हाणवर दाखल झाला आहे. वैष्णवी यांचा मुलगा हगवणे याने निलेश याच्याकडे दिला होता. त्यावेळी निलेश ने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती. त्यामुळे वारजे पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे.

तसेच, चव्हाणवर हिंजवडी मध्ये ड्रिंक अँड ड्राइव्हची केस आहे. २००९ मध्ये याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात अदखल पत्र गुन्हा दाखल आहे. निलेश याचा हगवणे यांच्यासोबत कौटुंबिक संबंध होता. आपल्याकडे जी तक्रार दिली आहे. त्यावरून कलम लावले आहेत. असही पोलिस उपआयुक्त कदम यांनी यावेळी सांगितलं आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments