Newsworldmarathi Mumbai: इयत्ता ११ वी (वर्ष 2025-26) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३ जून ऐवजी आता ५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती प्राथमिक शिक्षण संचालक (माध्यमिक) श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
नोंदणीसाठी वाढीव मुदत कादिली?
६ मे रोजीच्या शासन निर्णयातील इन-हाऊस कोट्याबाबतच्या सुधारणा व ३१ मे रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, कनिष्ठ महाविद्यालये आणि त्यास जोडलेल्या शाळांच्या युनिट ठरवण्यात काही बदल झाले. या बदलांचा नीट विचार करून विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम सुधारण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
इन-हाऊस कोट्याचे बदल नेमके काय?
खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 10% जागा इन-हाऊस कोट्यासाठी आरक्षित
मुंबई, ठाणे, उपनगर क्षेत्रात एक युनिट – एक शाळा ग्राह्य
राज्यातील इतर भागात – महसूली जिल्ह्यांनुसार युनिट निश्चित
नोंदणीची आकडेवारी (२ जून २०२५ पर्यंत):
विभाग नोंदणी संख्या
मुंबई 2,65,900
पुणे 1,87,925
कोल्हापूर 1,07,012
नाशिक 1,12,108
छ. संभाजीनगर 1,00,040
नागपूर 95,210
अमरावती 98,359
लातूर 58,586
इतर 61,712
एकूण 10,85,851 विद्यार्थी
महत्त्वाचे:
विद्यार्थी आणि पालकांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
तांत्रिक अडचणींसाठी ई-मेल – support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन – 8530955564 वर संपर्क साधावा.
नोंदणी व्यतिरिक्त पुढील टप्प्यांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.


Recent Comments