Newsworldmarathi Pune: राज्यातील महिलांवर होणाऱ्या छळाच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून, आता पुणे महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या कामगार आघाडीच्या ओमकार कदम या पदाधिकाऱ्यावर महिलेला कामाच्या ठिकाणी त्रास दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, संबंधित पदाधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हाही दाखल असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महिला अधिकाऱ्याने महापालिका आयुक्त, महिला समिती आणि सुरक्षा विभागाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेवटी तिने राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महिला अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार महिन्यांपासून पदाधिकारी सातत्याने धमकी देणे, केबिनमध्ये घुसून जाब विचारणे अशा प्रकारांमधून छळ करत होता. आयोगाने याची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली. मात्र, याप्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, महापालिका आयुक्त आणि यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिकेतील महिला अधिकाऱ्यांचा छळ होत असेल, तर सामान्य महिला सुरक्षित कशा राहणार? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये विचारला जात आहे. आयोगाची चौकशी सुरू असून, आगामी काळात काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आयोगाकडून दखल
भाजपचा एक पदाधिकारी आपला छळ करत असल्याची तक्रार महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. आयोगाने याची दखल घेऊन, आयोगातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत महापालिकेत जाऊन माहिती घेतली आहे. याबाबत संबंधित महिलेने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली.
काम करताना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाहीकरण्याची विनंती केली होती. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीकडेदेखील तक्रार दिली होती. या तक्रारीवर समितीसमोर सुनावणी झाली.


Recent Comments