Newsworldmarathi pune: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उसने पैसे देण्याच्या वादातून एका रिक्षाचालकाने महिलेचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घडली आहे. ही घटना पुण्यातील सिंहरोड परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्यामली कमलेश सरकार असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, नितीन चंद्रकात पाटील असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी नितीन हा रिक्षा चालक आहे. श्यामली सरकार आणि नितीन यांची ओळख रिक्षातून प्रवासाच्या दरम्यान झाली होती. तो तिला दररोज सायंकाळी बुधवार पेठेत सोडत असे. याच ओळखीच्या आधारे श्यामलीने नितीनकडून ५० हजार रुपये हात उसने घेतले होते. त्याने तिला पैसे परत मागितले असता, तिने पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली. त्यावेळी यातून त्यांच्यात वाद झाला. बुधवारी दुपारी नितीन श्यामलीला घेण्यासाठी धायरी येथील तिच्या घरी गेला. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा पैशांवरून वाद झाला. वाद विकोपाला गेला. त्याने श्यामलीची हत्या करण्याचं ठरवलं.
दरम्यान, रागाच्या भरात नितीनने श्यामलीच्या ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने घराबाहेरून कुलूप लावले आणि स्वतः घरातच लपून बसला. यामुळे कुणालाही या घटनेची माहिती मिळाली नाही. या घटनेनंतर तो दिवसभर घरातच होता. अखेरीस त्याने ही संपूर्ण घटना आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर गुरुवारी रात्री तो नांदेड सिटी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.


Recent Comments