Homeबातम्यामहापालिका निवडणुका तीन टप्प्यात होणार; ऑक्टोबरमध्ये बिगुल वाजणार

महापालिका निवडणुका तीन टप्प्यात होणार; ऑक्टोबरमध्ये बिगुल वाजणार

Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रात कोरोना नंतर राजकीय आरक्षण यामुळे लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी केली आहे. यामुळे याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले लागले आहे. असे असताना राज्य निवडणूक आयोग ऑक्टोबर महिन्यात निवडणूक वेळापत्रक जाहीर करू शकते.

याबाबत महत्वाची माहिती समोर आली असून तीन टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मतदानाचे नियोजन केले जात आहे आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान होईल. असेही सांगितले जात आहे.

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मते, प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार, 3 टप्प्यात निवडणुका घेण्याचे नियोजन केले जात आहे. राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 288 पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होऊ शकतात, याबाबत लवकरच अंतिम माहिती समोर येऊ शकते.

यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभागांची रचना केली जाईल. काही ठिकाणी प्रभागांच्या रचनेत आणि सीमांमध्ये बदल होतील. काही लोक याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे प्रभाग तयार करण्यासाठी दोन महिने लागतील. यामुळे आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अंतिम करण्यासाठी तीन ते साडेतीन महिने लागू शकतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे. या निवडणूक खुपच लांबल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कामांसाठी देखील अडचणी येत आहेत. निधी वाटपात देखील घोळ होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments