Homeपुणेशिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू

शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीपणे सुरू

Newsworldmarathi Pune: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज येथे सुरू आहे.प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजच्या सुमारे साडे चारशे शिक्षकांचे नियोजनबद्ध प्रशिक्षण सुरू आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या प्रभावी अंबालबजावणी, अध्यापनाची नवीन कौशल्य, अध्ययन क्षमता व बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक नवीन पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन, पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अशा अनेक विषयावर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण केंद्र प्रमुख डॉ.प्रभाकर क्षीरसागर, तज्ञ मार्गदर्शक भगवान पांडेकर, स्नेहल पाटोळे, संगिता वरुडकर,भागवत शिंदे,अविनाश महाजन,मधुकर क्षीरसागर, प्रा.जितेंद्र देवकर,विलास लोंढे, सारंग पाटील आदींसह प्रशिक्षक यांच्याकडून प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शक केले जात आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या यशस्वी अंबालबजावणी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा? अध्ययन कौशल्य, नव नवीन अध्यापन पद्धती याविषयी सविस्तर माहिती, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे असे प्रशिक्षणार्थी सुनील पानसरे ,शिक्षिका गायत्री हिले यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर अंतर्गत वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणात ४८६ शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.आठ वर्ग करण्यात आले असून २४ तज्ञ मार्गदर्शकांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व अद्यावत शिक्षण पद्धतीचे यशस्वीपणे प्रशिक्षण दिले जात आहे.

-डॉ.प्रभाकर क्षीरसागर.प्रशिक्षण केंद्र प्रमुख,अधिव्याख्याता डायट संस्था,पुणे.

या प्रशिक्षणातून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०,शिक्षण हक्क २००९ ,शिक्षण पद्धती आदींसह विविध बदल अभ्यासले जात आहे.याचा शिक्षकांना मोठा फायदा होईल.विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांनी अद्यावत असणे अवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, उद्याच्या सक्षम भारतासाठी नवीन सुसंस्कृत अन आदर्श पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.

-भगवान पांडेकर, शिक्षक समुपदेशक.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments