Newsworld pune : पत्रकार आणि युवा लेखक दिगंबर दराडे यांनी लिहिलेले सुंदर पिचाई यांच्या जीवनावरील पुस्तक तरुणांच्या पसंतीस उतरले आहे. मराठी भाषेमध्ये हे पुस्तक Book प्रकाशित झाल्यानंतर हिंदी वाचकांनी देखील या पुस्तकाला अधिकची पसंती दिली आहे. प्रा. मंजिरी नितिन गजरे यांनी हे पुस्तक हिंदीमध्ये अनुवादीत केले आहे. दिल्ली या ठिकाणी भरलेल्या जागतिक बुकफेअर मध्ये देखील सुंदर पिचाई या पुस्तकाला वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला. दराडे यांनी लिहिलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक ( rishi sunk) या पुस्तकाला देखील खूप लोकप्रियता मिळाली आहे.
मी जिथे जातो, तिथे भारत माझ्या बरोबर असतो. जगप्रसिद्ध Google चा भारतीय वंशाचा सीईओ ! ( Google Ceo)गुगलच्या नियंत्रणात सर्व जग आहे, पण ज्यांच्या नियंत्रणात गुगल आहे असे भारतीय वंशाचे सुंदर पिचाई सुंदर पिचाई ( Sundar Pichai)कसे घडले, गुगलचे सीईओ कसे बनते है सांगणारे व प्रत्येकाला प्रेरणा देणारे असे पुस्तक… अत्यंत बुद्धिमानी, संयमी, मुत्सद्दी असे सुंदर पिचाई हे गुगल आणि अल्फाबेट इंकचे सीईओ आहेत. भारतीय म्हणून आपल्यासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एका उत्कृष्ट लीडरच्या नेतृत्वाखाली जनप्रसिद्ध गुगल कंपनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतच राहणार आणि बाजारातील आपलं स्थान कायम टिकवून ठेवणार यात शंकाच नाही. या पुस्तकात, मध्यमवर्गीय ते सीईओपर्यंतचा प्रवास जगातील एक सन्माननीय सीईओ सुंदर पिचाई या नावाला एवढं वलय का आहे ? गुगल क्रोमचा निर्माता अत्यंत साधं तरीही प्रभावी व्यक्तिमत्त्व. गुगलविषयी बरंच काही….दराडे यांनी मांडले आहे.
युवा लेखक दिगंबर दराडे यांचे सुंदर पिचाई पुस्तक आता हिंदीत
Advertisements