Newsworld Mumbai : मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेन्द्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला उद्धव ठाकरेंनी केलेल्या एक तर तू राहिन किंवा मी राहिन या वक्तव्यासंदर्भात त्त्यावर देखील फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ”मी त्याही वेळेस सांगितलं होतं. राजकारणात तेही राहतील, मीही राहिन, सगळेच राहतात,
मी उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांसह सर्वच प्रमुख नेत्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी, सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, पण ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जो राजकीय संवाद आहे, विशेषतः दाक्षिणात्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हा फरक आहे, महाराष्ट्रात राजकीय संवाद संपला नाही. पण अनेक राज्यामध्ये दोन राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की जणू खून के प्यासें असं पाहायला मिळतं. ती कधी नव्हती आणि पुढेही राहू नये हा माझा प्रयत्न राहिन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.