Newsworld Pune : संपर्क संस्था बालग्राम च्या माध्यमातून अनाथ मुला मुलींचा सांभाळ करणे, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे व पुढे लग्न ही लावून देणे हे कार्य कौतुकास्पद असून मी ह्या संस्थेच्या पुणे जिल्ह्यातील सहा व राज्यातील बारा शाखांना सर्वतोपरी मदत करेन असे वचन आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज आमदार झाल्यानंतर मुंबई येथून पुण्याकडे येताना मळवली येथे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने संपर्क बालग्राम संस्थेस उपयोगी साहित्य भेट देण्याचा तसेच विद्यार्थ्यांतर्फे चंद्रकांतदादांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विश्वस्त सतीश कोंडाळकर, बालग्राम चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर, चेतन जोशी, संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने आ.चंद्रकांतदादा पाटील, संदीप खर्डेकर, मंजुश्री खर्डेकर यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. संस्थेतील विद्यार्थिनींनी सलामी देऊन मान्यवरांना अभिवादन केले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर अमितकुमार बॅनर्जी यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.