Newsworldmarathi Pune: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठूरायाच्या पंढरीत भाविकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका अहोरात्र कार्यरत होती. या वेळी १०९५ भाविकांना आरोग्यसेवा देण्यात महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेला यश आले आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक, वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. या वेळी पंढरीत तत्काळ आरोग्य सेवा मिळाली पाहीजे अशी सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांनी केली होती. त्यानुसार राज्याच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेने डायल १०८ नावाचा कक्ष उभारण्यात आला होता. विशेष नियंत्रण कक्षाद्वारे भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली. राज्यात भारत विकास गृप (बीव्हीजी) द्वारे १०८ रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते.
भाविकांच्या सेवेसाठी १०८ रुग्णवाहिकासेवेद्वारे शहरात २४ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. यात १४ रुग्णवाहिका ॲडव्हांस लाईफ सपोर्ट (ALS) तर १० रुग्णवाहिका बेसिक लाईफ (BLS) सपोर्ट या प्रकारातल्या होत्या. विशेषबाब म्हणजे ३५ डॉक्टर,३० चालक, १० प्रशासकीय अधिकारी व नियंत्रण कक्षातील १० कर्मचाऱ्यांनी अरोग्यसेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
अशी दिली आरोग्य सेवा
१) हृदयविकार : ११
२) वैद्यकीय : ९८१
३) इतर : ८०
४) पॉली ट्रॉमा : २२
५) हल्ला : १
एकूण : १०९५


Recent Comments