Newsworld Pune : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई,उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजुषा शेलुकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. चारुता प्रभूदेसाई यांनी लिहिलेल्या गीताचे गायन प्रशालेतील विद्यार्थी तनय नाझीरकरने केले.शिक्षक गणेश देशमुख यांनी चिंतनातून संविधानाचे शिल्पकार,वाचनाची प्रेरणा देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कृतीरूप अभिवादन करण्याचे आवाहन केले.राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Advertisements