Homeपुणेतांत्रिक अडचणीमुळे दिल्लीला जाणारे विमान पुन्हा पुण्यात उतरले

तांत्रिक अडचणीमुळे दिल्लीला जाणारे विमान पुन्हा पुण्यात उतरले

Newsworldmarathi Pune: पुणे विमानतळाहून सकाळी दिल्लीकडे जाणारे स्पाइसजेटचे विमान तांत्रिक बिघाडामुळे परत पुण्यात उतरवण्यात आले.

विमान उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच पायलटला तांत्रिक अडचण जाणवली. त्यानंतर पायलटने एटीसीकडे पुण्यात परतण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच विमान सुरक्षितपणे पुणे विमानतळावर उतरवण्यात आले.

प्रवाशांनी या घटनेला ‘इमर्जन्सी लँडिंग’ असे म्हटले असले तरी विमानतळ प्रशासनाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. “मेडे कॉल आलेला नव्हता, त्यामुळे ही नियमित लँडिंग मानली जाते,” असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments