Newsworldmarathi Mumbai: पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज (रविवार) पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं.
Recent Comments