Newsworldmarathi Pune: बोलके डोळे, निरागसता, नैसर्गिक अभिनय आणि बालवयातच प्रगल्भ अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या ‘जिप्सी’ चित्रपटांत झळकलेल्या बालकलाकार कबीर खंदारे चा एकता सेवा प्रतिष्ठान च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व महाराष्ट्राच्या शौर्य, प्रेरणा, आणि आस्थेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देत कबीर च्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात.
यावेळी बोलताना गणेश शेरला म्हणाले “जिप्सी” चित्रपटासाठी नुकताच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार तसेच भारत सरकारचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार कबीर खंदारे ला महामहीम राष्ट्रपती श्रीम. द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते मिळाला असून कबीर च्या या दैदिप्यमान यशामुळे मराठी चित्रपट क्षेत्रात दक्षिण उपनगराचा नावलौकिक वाढला आहे. चित्रपट क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळवत असल्याची बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे शेरला यांनी सांगितले.
यावेळी अजय गुटगे, शिशी खंदारे,बद्रीनाथ जन्म, धन्यकुमार गुगळे, सचिन पाटोळे,अश्विनी चिन्नी, अरुण गांजे, भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व एकता सेवा प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments