Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या निमित्ताने 27 वर्षांपासून पुणे नवरात्रौ महिला महोत्सव सौ. जयश्री बागुल यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात चालू आहे. महिलांच्या कला गुणांना संधी मिळावी याकरिता महिलांना पुरस्काराने सन्मानित करावे आणि धार्मिक श्रद्धा परंपरा जोपासली जावी यासाठी शिवदर्शन-सहकारनगर परिसरात मा उपमहापौर आबा बागुल यांच्या अध्यक्षतेखाली उभारलेल्या दाक्षिणात्य धाटणीच्या श्री लक्ष्मी माता मंदिरासमोर प्रांगणात भव्य नवरात्रोत्सव 10 दिवस हा संपन्न होतो.
अशा श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात 500 हुन अधिक महिलांनी सामूहिक आरती केली आणि सूक्त व सहस्त्र विष्णुनामाचे सामूहिक पाच – पाच वेळा पठण सामूहिक पद्धती केले या प्रेक्षणीय सोहळ्यासाठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गेली 27 वर्षे हा अनोखा चालू असून महिलांनी समाधान व्यक्त केले.
नंतर या कार्यक्रमात पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल स्वतः सहभागी झाले होते. याबद्दल देखील सर्व महिलांनी समाधान व्यक्त केले.


Recent Comments