Homeपुणेदि पूना गुजराती केळवणी मंडळाची शताब्दी वर्षातील निवडणूक बिनविरोध

दि पूना गुजराती केळवणी मंडळाची शताब्दी वर्षातील निवडणूक बिनविरोध

Newsworldmarathi Pune: शिक्षण क्षेत्रात गेल्या शंभर वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दि पूना गुजराती केळवणी मंडळाची नियतकालिक निवडणूक यंदाच्या शताब्दी वर्षात बिनविरोध पार पडली आहे. या संदर्भातील माहिती संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी दिली.

२०२५-२०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी मंडळाचे प्रमुख म्हणून नितीनभाई देसाई यांची निवड झाली आहे. तर किरीटभाई शहा आणि राजेंद्रभाई शहा हे विश्वस्त म्हणून निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे २०२५-२०३१ या सहा वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारिणी सभासद म्हणून जनकभाई शहा, हेमंतभाई मणियार, विनोदभाई देडिया, दिलीपभाई जगड, मोहनभाई गुजराती, ब्रजेशभाई शहा, निलेशभाई शहा, किरणभाई शहा, दिपेनभाई शहा व निकुंजभाई शहा हे दहा सभासद बिनविरोध निवडून आले.

“शिक्षण हे केवळ ज्ञानदान नसून सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे,” या दृष्टीकोनातून संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे. पारंपरिक मूल्ये व अत्याधुनिक शिक्षण यांचा समन्वय साधत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या मंडळ आर. सी. एम. गुजराती प्रशाला आवार (कसबा पेठ), हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय आवार (बुधवार पेठ), आणि PGKM स्कूल आवार (कोंढवा) या तीन ठिकाणी शैक्षणिक केंद्रे चालवित आहे.

संस्थेच्या शैक्षणिक प्रवासात अलीकडेच एक मोलाची भर घालण्यात आली आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये आत्मसात करता यावीत, यासाठी हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात २०२५ पासून *बी.एस्सी. सायबर सुरक्षा (B.Sc. Cyber Security)* हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार, सोशल मीडिया वापर आणि डेटासुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हॅकिंग, फसवणूक, डेटाची चोरी यांसारख्या घटनांमुळे सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

याशिवाय मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी या केंद्राचा लाभ घेत आहेत. माफक शुल्कात दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देत, आजवर शेकडो विद्यार्थी राज्य व केंद्रातील विविध सेवांत उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.

सध्या मंडळाच्या विविध संस्थांमध्ये मिळून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, शताब्दी वर्षात बिनविरोध निवडणुकीमुळे मंडळाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला अधिक बळ मिळाले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments