Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ युवा फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हे शिबिर आज कात्रज भाजी मंडई येथे संपन्न झाले. नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या शिबिरात रक्तातील सर्व घटकांची तपासणी, रक्तदाब, साखर, कोलेस्टेरॉल, तसेच डोळ्यांची तपासणी (मोतीबिंदू व काचबिंदू) अशा विविध चाचण्यांचा समावेश होता. महिलांसाठी विशेषतः स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली. याशिवाय दातांची तपासणी, सफाई, पॉलिश आणि सिमेंट फिलिंग या सेवा देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
या सर्व तपासण्या नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य देण्यात आल्या. तपासणीचे रिपोर्ट राणीताई भोसले जनसंपर्क कार्यालय, बालाजीनगर, पुणे-४३ येथे मिळणार आहेत.
या उपक्रमात पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षा राणी रायबा भोसले तसेच रायबा भोसले (संस्थापक, राजगड ग्रुप) यांच्या पुढाकाराने शिबिर यशस्वीपणे पार पडले.
या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून सामाजिक बांधिलकीचा संदेश दृढ झाला.


Recent Comments