Homeपुणेफडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही- खडसे

फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही- खडसे

Newsworld Pune : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसेंचे ( Eknath Khadse ) सूर बदलले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही असं आता एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

Advertisements

देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. आपला प्रचंड छळ केला असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी छळ केला म्हणून मी पक्ष सोडला असाही आरोप केला होता.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. बहुमत, जनमत त्यांच्या बाजूला आहे. फडणवीस हे निवडून आले हे मान्यच करावं लागणार आहे. व्यक्तिगत मतभेद, टीका वगैरे असू शकते. त्याला फार महत्त्व न देता लोक ज्यांना निवडून देतात त्यांच्या बाजूला बहुमत असतं हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. आमचा पराभव झाला आहे, त्याची कारणं असू शकतात. पुढे काय घडेल? ते काळ ठरवेल. पण विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणं ही माझ्यावरची जबाबदारी आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments