Newsworld Mumbai : कॉंग्रेसने संविधान बदलणार असा खोटा नेरेटीव्ह सेट केला त्यामुळे लोकसभेत फटका बसला. परंतू विधानसभेत मतदाराचे गैरसमज दूर केले म्हणून महायुतीला इतके मोठे यश मिळाल्याचे आठवले यांनी सांगितले. आरपीआयला एक मंत्री मिळावे अशी मागणीही यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे.
भाजपाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असल्याने आपण शिंदे यांना केंद्रात यावे अशी विनंती केली होती. परंतू त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना महाराष्ट्रातच राजकारण करायचे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा योग्य आदर महायुतीत राखला जाणार आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.