Newsworldmarathi Pune: भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अमोल बालवडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अमोल बालवडकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमोल बालवडकर म्हणाले की, माझ्या आयुष्यातील कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन. कोणताही पक्ष मोठा व्हावा, मात्र त्या पक्षाने पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपामध्ये कार्यरत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे सांगत त्यांनी थेट भाजपवर टीका केली.
पुढे बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, आता अमोल बालवडकर भाजपाला दाखवून देईल की खरा कार्यकर्ता म्हणजे काय असतो. या निवडणुकीत भाजपाला ‘धोबीपछाड’ देणार असून, ही कृती वचपा काढण्यासाठी नाही तर धोका देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमोल बालवडकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आणि उमेदवारीमुळे पुण्यातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.


Recent Comments