Homeपुणेनगरसेवक नसतानाही ९ वर्षांपासून २४ तास खुले ‘जनसंपर्क’ कार्यालय; बाप्पु मानकर यांना...

नगरसेवक नसतानाही ९ वर्षांपासून २४ तास खुले ‘जनसंपर्क’ कार्यालय; बाप्पु मानकर यांना भाजपची उमेदवारी

Newaworldmarathi Pune: पुणे शहरातील पहिले २४ तास खुले जनसंपर्क कार्यालय सुरु करत, नगरसेवकपद नसतानाही गेल्या ९ वर्षांपासून २४x७ उपलब्ध राहणाऱ्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांना भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) येथून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

२०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. त्यावेळी याची जोरदार चर्चा झाली होती. गेल्या ९ वर्षांपासून हे कार्यालय आजपर्यंत अव्याह्तपणे सुरु आहे. भाजपचे शहरपातळीवरील पदाधिकारी म्हणून काम करत असतानाही हे कार्यालय सातत्याने सुरू ठेवत, त्यामाध्यमातून सुमारे ६ हजारांहून अधिक नागरिकांची कामे करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केला आहे. तक्रारी, अर्जांचा पाठपुरावा आणि प्रशासनाशी समन्वय या माध्यमातून हे कार्यालय नागरिकांसाठी व विशेषतः येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरल्याचे येथील नागरिक सांगतात.

बाप्पु मानकर यांनी पक्षसंघटनेत पूर्णवेळ ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करताना, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरभर युवकांचे संघटन केले. एकीकडे शहरपातळीवरील काम सुरू असताना, दुसरीकडे प्रभागातील नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. शहरभर उभे केलेले संघटन, पक्षासाठी केलेले काम, आणि प्रभागातील दांडगा जनसंपर्क यामुळे भाजपच्या सर्वच वरिष्ठांनी त्यांना उमेदवारीची संधी देण्यासाठी अनुकूलता दाखवली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनांपासून ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत, पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडत, पक्षाने सोपवलेले काम प्रामाणिकपणे करण्यावर मी भर दिला. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. यामुळे पक्षाने मला संधी दिल्याचे, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.

‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’चे आयोजन..
कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी राबविलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेअंतर्गत बाप्पु मानकर यांनी मिशन स्वच्छ प्रभाग २५ अभियानाचे आयोजन केले होते. प्रभागातील गल्लीबोळात या अभियानाची टीम पोहोचली होती. कायमस्वरूपा अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचे आश्वासन या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments