Homeभारतडायसप्लॉटच्या सर्व समस्या सोडविणार; अर्चना पाटील यांची ग्वाही

डायसप्लॉटच्या सर्व समस्या सोडविणार; अर्चना पाटील यांची ग्वाही

Newaworldmarathi Pune: डायसप्लॉट व अमीना टॉवर परिसरातील पायाभूत सुविधा मजबूत करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपलाच कौल द्यावा, असे आवाहन प्रभाग क्रमांक २२ (क) मधील भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी नागरिकांना केले आहे. शुक्रवारी त्यांनी या भागातील डायसप्लॉट आणि अमीना टॉवर परिसरात घरोघरी प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला.

या प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. विशेषतः महिलावर्गाच्या दैनंदिन अडचणी, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, स्ट्रीटलाइट, सुरक्षा तसेच नागरी सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. महापालिकेच्या माध्यमातून या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत पुन्हा एकदा संधी दिल्यास नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अर्चना पाटील यांनी सांगितले. विकासाभिमुख दृष्टिकोनातून प्रभागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी अर्चना पाटील यांचे औक्षण करून स्वागत केले. नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेमामुळे प्रचारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे. नागरिकांचे प्रेम आणि विश्वास पाहून माझा उत्साह द्विगुणित झाला असून हा विजय विश्वासाचा आणि विकासाचा असेल,” असे मत उमेदवार अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments