Homeपुणेढोले पाटील एज्युकेशनचे चेअरमन सागर ढोले पाटील होतायेत दिव्यांगांचा आधारवड

ढोले पाटील एज्युकेशनचे चेअरमन सागर ढोले पाटील होतायेत दिव्यांगांचा आधारवड

Newsworld Pune : 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचा उ‌द्देश दिव्यांग व्यक्तीच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना समाजात सन्मानाने स्थान मिळवून देणे हा आहे.

Advertisements

ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील यांनी दिव्यांग कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करत समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ढोले पाटील परिवार सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुरुवातीपासून सक्रिय असून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी योगदान दिले आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने आजवर चार मोठे दिव्यांग कॅम्प आयोजित केले असून त्यामधून हजारो दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळाला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांगांना मोफत अवयव पुरवले गेले आहेत. त्यांनी या व्यक्तींना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा ध्यास घेतला आहे. “शारीरिक अडथळे मनाला खचवू शकत नाहीत, कारण जिथे मनाची शक्ती असते तिथे अशक्य काहीच नसते,” हे सागर ढोले पाटील नेहमी सांगतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान प्राप्त झाला आहे.

येणाऱ्या 16 डिसेंबर रोजी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, भारत विकास परिषद विकलांग केंद्र आणि अन्य सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पद्वारे 1,000 दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक सेवा देण्याचे उद‌दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दिव्यांग कॅम्पसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत है कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला आणखी बळ मिळणार असून, दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल.

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येकाने दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे ठरवले पाहिजे. त्यांना सहानुभूती नव्हे तर समानता आणि सन्मानाची गरज आहे. सागर ढोले पाटील यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेऊन आपण दिव्यांगांसाठी योगदान देऊ शकतो. इच्छाशक्ती आणि दया असल्यास आपण समाजातील प्रत्येक घटकाला उन्नतीसाठी हातभार लावू शकलो. या कार्याला पुढे नेण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प करूया.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments