Newsworld Mumbai : भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळं दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
राहुल नार्वेकर हे बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तर, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळेस नगरसेवक आहेत. तर, त्यांची मेहुणी हर्षतादेखील महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली
त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष बदलला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. भाजपने त्यांनी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत 57 हजार 420 मते मिळाली, त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा (41 हजार 225 मते) यांचा पराभव केला.
राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला.