Newsworld Mumbai : भारतीय जनता पार्टीच्या वतीने मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मुंडे कार्ड खेळले जाणार असल्याच्या चर्चेना उधाण आले आहे. महिला ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणे वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे.
मागील आठवड्यापासून पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्ये सातत्याने भेटी होत आहे आज रविवारी देखील पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे.
राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या सातत्याने भेटी होत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.मागील निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वेळा मुंडेंना डावलण्यात आले. एवढेच नव्हे तर समाजातून अन्य नेतृत्व उभारण्याचे देखील प्रयोग करण्यात आले. मात्र हे प्रयोग सर्व अयशस्वी ठरल्याने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंकजा मुंडे यांना डावलून केंद्रामध्ये डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. मात्र तितकासा भाजपला फायदा होताना दिसला नाही. पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या खांद्यावरती भाजपने जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंकजा मुंडे यांना विधान परिषद देण्यात आली. त्या पाठोपाठ लगेच त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे देखील सांगण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही मताने पराभूत झाल्यानंतर संपूर्णपणे मराठवाड्यातील ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओबीसी समाजाची असलेली वोट बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप यापुढे सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. त्याकरता पंकजा मुंडे यांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये निश्चित मानली जात आहे.