Newsworld Pune : पुणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आता या स्टेशनचे रुपडे बदलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी संख्येला आणि गाड्यांच्या वाढत्या वहातुकीला सामोरे जाण्यासाठी स्टेशनच्या रचना आणि यार्डचे रिमॉडेलिंग करणे अत्यावश्यक झाले आहे.
सध्याच्या 6 फलाटांव्यतिरिक्त आणखी फलाटांची निर्मिती होईल. यामुळे अधिक गाड्या सहज हाताळता येतील. 24 डब्यांच्या गाड्या थांबण्यासाठी सध्याच्या फलाटांच्या लांबीमध्ये सुधारणा केली जाणार आहे. व्यवस्थापनासाठी यार्डचे रिमॉडलिंग होईल, जेणेकरून गाड्यांची घडामोड गतीने आणि सुरळीत होईल.
स्टेशन परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी हरित उपाययोजना राबवण्यावर भर दिला जाईल. स्टेशनवर अत्याधुनिक तंत्रज्ञान, उदा. QR कोड आधारित तिकीट तपासणी व जलद प्रवेशासाठी विशेष गेट्स उभारली जातील.
या बदलांमुळे पुणे रेल्वे स्टेशन देशातील उच्च दर्जाच्या स्थानकांमध्ये मोजले जाईल. प्रवाशांचा वेळ आणि त्रास कमी होईल तसेच वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल. यामुळे स्थानकाच्या एकूणच विकासाला चालना मिळेल आणि प्रवासी अनुभव सुधारेल.
प्रवाशांसाठी सुधारित सुविधा:
– स्वच्छ व आधुनिक प्रतीक्षालये.
– अपग्रेडेड स्वच्छतागृह सुविधा.
– अन्न व पिण्याच्या पाण्याच्या दर्जेदार सुविधा.
– डिजिटल माहिती पटल व स्क्रीन.
– २४ डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म
– १८ ते २० डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म
– मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने आणखी दोन नवे प्लॅटफॉर्म
– एक प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल
– पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन स्वतंत्र मुख्य लाइन