Newsworld solapur : बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाले होते, त्याच ईव्हीएममध्ये हे झाले होते. अमेरिकेतील अनेक राज्यात आणि अनेक देशात देखील ईव्हीएमवर मतदान होते. हवं तर राहुल गांधी यांनी मामाच्या इटलीत जावून चौकशी करावी, असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी लागवला.
मारकडवाडीत ईव्हीएमविरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेत तुफान फटकेबाजी केली.
काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना आपल्याला उधळून लावावे लागेल.
ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे.