Homeपुणेराज्यस्तरीय आंतरशालेय, महाविदयालयीन ६ वा जाधवर विज्ञान महोत्सव

राज्यस्तरीय आंतरशालेय, महाविदयालयीन ६ वा जाधवर विज्ञान महोत्सव

Newsworld pune : प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘सहाव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल – १ येथे महोत्सव होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी), कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात होणार आहे. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत नॅशनल एनर्जी कर्न्झव्हेशन, प्युरिफिकेशन मेथड फॉर वॉटर एअर सॉईल, बॅटरी फ्रॉम वेस्ट, बायो फ्युएल फ्रॉम अ‍ॅग्रीकल्चर वेस्ट, स्मार्ट एआय बेस रोबोट, बायो मेडिकल वेस्ट प्युरिफिकेशन, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी इन व्हेईकल इंडस्ट्री अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांसाठी हा एक अभिनव व आदर्श उपक्रम असणार आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळणार आहे. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २४ डिसेंबर असून गटाप्रमाणे अनुक्रमे ७७९८१०११२२, ९७६४७०७३७९, ७९७२४८३५७५, ९०६७९०९०७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संशोधन करणा-या विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती
भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असे अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments