Newsworld marathi Pune : जेएसपीएम संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी प्रथम इन्फोटेक फाउंडेशन व जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ खुशाल मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉ संजय सावंत डॉ वसंत बुगडे उपस्थित होते. या उपक्रमाच्या समन्वयक प्रा शिबा बनसोडे दिपाली थोरात प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या ट्रेनर गायत्री बल्लाळ यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सामाजिक उपक्रमाबरोबरच भावी शिक्षक हा सर्वगुणसंपन्न झाला पाहिजे सर्वसमावेशक दृष्टिकोन निर्माण व्हावा नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासाकडे वाटचाल करत असताना भावी शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्ते सोबत स्वार व्हावे या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंढे यांनी बोलताना सांगितले की सध्या शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शिरकाव झालेला आहे पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगाच्या पाठीवर काम करत असताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी वाटचाल करावी याची जाण भावी शिक्षकांना असणे गरजेचे आहेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शिबा बनसोडे व आभार प्रदर्शन प्रा दत्तात्रय साबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा निलोफर शेख पटेल, प्रा डॉ भरत गोरडे, प्रा अजित चव्हाण, प्रा अर्चना राऊत, डॉ वर्षा गायकवाड, सुग्रीव जाधव, तेजस देवल, कोमल थोरात, कांचन सोनवणे, प्रियंका कुतवाल, काजल किरण, कोमल मुळीक, चेतन चितळे, औदुंबर काळे, मुसेब शेख आदींनी परिश्रम घेतले.