वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पवित्र काम : उपमुख्यमंत्री शिंदे

0
संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी (दि. १६)आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते. वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठीचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला. तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली

आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

0
Newsworldmarathi Pune: जागतिक महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ व आदर्श महिला पुरस्कार देण्यात आले. हॉटेल ऋतुगंध येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या रूपाली ठोंबरे-पाटील व सामाजिक कार्यकर्त्या आरती जमदाडे-साठे उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका व आंतरराष्ट्रीय मानवधिकार सुरक्षा परिषदेच्या जिल्हाध्यक्षा अनुपमा जाधव-कुसाळकर, सुषमा भालेकर, वर्षा कुदळे, अपर्णा दुबे, राधा पांगारे, प्रीती विचारे, गीता गाटूळे, अंजली रानडे, पल्लवी शिंदे, सिद्धिका जाधव, दंताळे ज्वेलर्सचे क्षितीज दंताळे, राधिका जाधव आदी उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा यावेळी मान्यवरांची उपस्थितीत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली विशेष मुलांसोबत होळी साजरी

0
महाराष्ट्रात होळी आणि धुलिवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलिवंदनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. होलिका दहनानंतर आज दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते. दरम्यान, पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे‘ चे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीदेखील सहभाग घेत भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी गेली तीस वर्ष झाले पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, मतिमंद, दिव्यांग, रेल्वे फलटावर बूट पॉलिश करणारे, देवदासी भगिनींची मुलं, डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या मुलांचाही सहभाग असतो. भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक मुरली अण्णांकडून कौतुक पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो. संवेदनशीलपणाने असे उत्सव साजरे गेले जातात. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीम च्या माध्यमातून विशेष मुलांसाठी त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात. अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांचे आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत नाही नशिबाने त्यांच्यावरती ही परिस्थिती असते. पण भोई प्रतिष्ठान गेली तीस वर्षे झाले त्यांच्यासोबत अनेक उत्सव साजरं करत आहे. मी दरवर्षी या सोहळ्याला उपस्थिती लावतो. आमच्या शहराचे एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये एक समता आहे विश्वबंधुत्व आहे. त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि विशेष करून डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीम कौतुक केलं पाहिजे. पण समाजात ज्यांना कोणी त्यांच्यासोबत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न भोई करतात आणि आम्हालादेखील संधी देतात. त्यासाठी त्यांचे आभार. अशा शब्दात मंत्री मोहोळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दगडूशेठ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

0
Newsworldmarathi Pune: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित महोत्सवात नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सह्याद्री फार्म कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्म चे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. द्राक्षाच्या हंगामात अशा पद्धतीची आरास मंदिरात गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. आज सह्याद्री फार्म ला २२,००० शेतकरी जोडले गेले आहेत. भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून म्हणून सह्याद्रीची ओळख आहे. द्राक्षाच्या नवीन पेटंटेड वाणांचे उत्पादन सह्याद्री फार्म्स करीत आहे. सुनील रासने म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हापरिषदेच्या मुख्य दालनात लाचलुचपत विभागाची धाड; महिला इंजिनीयर आणि दोन अधिकारी अडकले..

0
Newsworldmarathi Pune : पुणे जिल्हा परिषदेच्या दालनात भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाटला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदाराच्या कामाचे बिल काढण्यासाठी मागितलेल्या पैशाने त्यांचा कारभार लाच लुचपत विभागाने अधिकाऱ्यांना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक वरिष्ठ त्यानंतर त्याचा कनिष्ठ आणि तिसरी त्यांची महिला इंजिनीयरचा यात समावेश आहे. बुधवार दि १३ रोजी सायंकाळी दरम्यान हा प्रकार जिल्हा परिषदेच्या दालनांत घडल्याने विकासाच्या नावाखाली अधिकारी लूट कोणत्या मार्गाने करतात याचा हा भक्कम पुरावा मिळाला आहे.होळी सणाच्या मुहूर्ता वर भ्रष्ट कारभाराची बोंबा-बोंबच या निमित्ताने झालेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यातील गलांडवाडी गाव येथील एका विकास कामाचे टेंडर तक्रारदार प्रवीण शिवाजी कदम यांनी घेतलेले होते चाळीस लाखाचे त्यांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येणे होते हे बिल काढण्यासाठी या तीन अधिकाऱ्यांनी टक्केवारी प्रमाणे पैशाची मागणी केली होती अखेर तडजोड करायची म्हणून ७८ हजार रुपये देऊन बिल काढण्याचा फार्मूला ठरला आणि हाच फार्मूला या बिल काढण्याच्या भानगडीने उघड झाला आहे. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाला अगोदरच कळविले होते ठरल्याप्रमाणे हा सापळा रचण्यात आला आणि संध्याकाळी होळी पेटण्याच्या टायमालाच भ्रष्टाचाराची ही बोंबाबोंब विभागाने उघड केली आणि मोठी बोंबाबोंब झाली आहे . जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरी सामाजिक विकास कामांसाठी मोठा निधी खर्च केला जातो यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाणी विभाग जलसंधारण छोटे पाटबंधारे एकात्मिक बाल विकास अशा विविध स्वरूपाने छोट्या छोट्या विभागातून कोट्यावधी रुपयांचा सामाजिक कामे करण्यासाठी निधी खर्च केला जातो सामाजिक कामे करण्यासाठी या प्रत्येक विभागातून ठेकेदारी स्वरूपाने कामे करण्यासाठी सुरुवातीला ठेका तयार करण्याचे प्रोसेस केले जाते याला गोंडस नाव टेंडर असे म्हणतात. हे टेंडर सुद्धा या विभागातून मॅनेज करण्याचा प्रताप केला जात आहे हे सर्वश्रुत असताना सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकून बहिरे दिसून आंधळे अशी भूमिका बजावत असतात याचा विपरीत परिणाम या प्रकाराने उघडा झालेला आहे. ठेकेदारी ही राजकीय आशीर्वादात केली जात असली तरी ती अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची गुलाम बनलेली असते टक्केवारीच्या वसुली शिवाय अधिकाऱ्यांकडून कुठल्याही स्वरूपाची कागदी कारवाई पूर्ण केली जात नाही आणि म्हणून देणे-घेणे हे नित्याचेच इथे ठरलेले असते आणि हा सर्व प्रकार कार्यालय सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेत केला जातो आज खऱ्या अर्थाने होळी सण आहे. होळी पारंपारिक सण असून होळीच्या कडेने बोंबाबोंब करीत गावामध्ये ती साजरी केली जाते आज जिल्हा परिषदेमध्ये ही होळी भ्रष्टाचाराला पकडले म्हणून बोंबाबोंब करून झालेली आहे असे म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने जिल्हा परिषदेमध्ये मोठा सावळा गोंधळ असून भ्रष्टाचाराचे आगारच आहे की काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. दोन व्यक्ती आणि एक महिला अधिकारी एकाच वेळी जाळ्यात पकडण्याची ही किमया लाच लुचपत विभागाला करण्यासाठी गेले पाच दिवस झगडावे लागलेले आहे गेले पाच दिवसापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून होळीच्या मुहूर्ता वरती तिला अंतिम स्वरूप मिळाले आहे. लाचलुचपत विभागाने अशा स्वरूपाची कारवाई प्रथमच केलेली नसून राज्यांमध्ये अनेक ठिकाणी अनेक कार्यालयातून अशा स्वरूपाच्या मागील काळात घटना घडलेल्या आहेत पण या या घटनांचा अखेर आणि शेवट काय झाला हे मात्र सविस्तर रित्या नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे एखाद्या लाचलुचपत विभागात सापडलेल्या अधिकाऱ्यांची कारवाई ही शेवटच्या क्षणी काय झाली याची माहिती सुद्धा प्रसारमाध्यमातून मिळावी अशा स्वरूपाची मागणी या कारभाराच्या प्रश्नाकडे पाहून जनसामान्यात होणे साहजिकच आहे

तळजाई टेकडीवर रंगली राजकीय होळी…

0
Newsworldmarathi Pune: आज धुलीवंदन निमित्त तळजाई टेकडी येथे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर यांनी सहकाऱ्यांसह रंगांच्या सणाचा आनंद घेतला. यावेळी खेळताना उपस्थितांनी कोरड्या रंगांचा वापर करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन धुळवड खेळला आणि या सणाच्या आनंदात रंगबेरंगी वातावरण निर्माण केले. ‘आनंदाने होळी खेळा, पण पर्यावरणाचा विचार करा’ असे आवाहन करत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी स्थानिक सहकार्याच्या मदतीने एकत्रित येत सण साजरा करण्यात आले होते, आणि सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची महत्त्वाची भूमिका ठरली

अजित पवारांच्या घरी शुभमंगल सावधान! जय पवार चढणार बोहल्यावर….

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता सासरे होणार आहे. अजितदादांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ऋतुजा पाटील या पवार घराण्याच्या सून होणार आहे. खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडीचा फोटो शेअर करून माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पवार घरात सनईचे सूर घुमणार आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचं लग्न ठरलं आहे. जय पवार तसे राजकारणापासून दूरच राहिले आहे. उद्योग क्षेत्रात जय पवार यांना विशेष गती आहे. काही वर्षे दुबईत त्यांनी व्यवसाय केल्याचं सांगितलं जातं. परंतु गेले काही वर्षे ते मुंबई आणि बारामतीतच असतात. सध्याही ते व्यवसाय सांभाळत असल्याचं सांगितलं जातं. त्यांचं लग्न हे ऋतुजा पाटील यांच्याशी ठरलं आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रूपयांची देणगी सुपूर्त

0
Newsworldmarathi Pune: पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने सगल दुसर्‍या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजक श्री. पुनितदादा बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि धारीवाल फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना देण्यात आला. यावेळी पुणे शहर पोलिस दलाचे डीसीपी मिलिंद मोहीते, डीसीपी हिम्मत जाधव, सिनेचित्रपट अभिनेता आकार ठोसर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व सार्वजनिक उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे. पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुनित बालन ग्रुप संघाने पुने शहर पोलिस संघाचा ५५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये १२३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पुनित बालन यांनी नाबाद २६ धावांची खेळी केली. याशिवाय राहूल साठे (३२ धावा), ऋतुराज वीरकर (२७ धावा) आणि आतिश कुंभार (नाबाद २१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे शहर पोलिस संघाचा डाव ६८ धावांवर मर्यादित राहीला. सामन्याचा संक्षिप्त निकालः पुनित बालन ग्रुपः १० षटकात ४ गडी बाद १२३ धावा (पुनित बालन नाबाद २६, राहूल साठे ३२, ऋतुराज वीरकर २७, आतिश कुंभार नाबाद २१, प्रशांत गायकवाड २-१५) वि.वि. पुणे शहर पोलिसः १० षटकात ८ गडी बाद ६८ धावा (विपुल गायकवाड नाबाद १७, अभिजीत ढेरे ११, उल्हास कदम १०, कुणाल भिलारे २-८, आदित्य कर्जतकर २-८, अनिकेत कुंभार २-११); सामनावीरः राहूल साठे;

Maharashtra Budget 2025 : अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक

0
Newsworldmarathi Mumbai : अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वृध्दी होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनांमुळे मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे. खाजगी गुंतवणुकीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे, रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृध्दी होते आहे. याव्यत‍िरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रयशक्ती वाढली आहे. त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झाला आहे. परिणामी गुंतवणूक-रोजगार निर्मिती- वाढीव उत्पन्‍न- मागणी-गुंतवणूक असे विकासचक्र फिरते राहणार आहे. नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार मुंबई – नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. राज्याचे लॉजिस्टिक्स धोरण जाहीर करण्यात आले आहे. ५ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत वडाळा, खारघर यासह इतर ठिकाणी बीकेसीप्रमाणं व्यापारी केंद्र उभारणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

Maharashtra Budget 2025 : जिल्ह्यांचा निर्यातकेंद्र म्हणून विकास करणार

0
Newsworldmarathi Mumbai : Maharashtra Budget 2025 : निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरीता राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023 जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषि निर्यात क्षेत्रे, निर्यातकेंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4 टक्‍के झाले आहे. यासोबतच ‘एक जिल्हा-एक उत्पादन’, जिल्ह्यांना निर्यातकेंद्र म्हणून विकसित करणे, राज्य-जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. असही अजित पवार यावेळी म्हणाले.