Breaking! रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश…

0
Ravindra Dhangekar Pune Press Conference : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँगेस सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. धंगेकर यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी काँग्रेसला आता रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, “अशा प्रकारचा (पक्ष सोडण्याचा) कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो.” माजी आमदार धंगेकर म्हणाले, “मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे. माजी आमदार धंगेकर म्हणाले, “मी शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर असल्याच्या बातम्या मधल्या काळात वर्तमानपत्रांनी दिल्या होत्या. त्यानंतर डोक्यावरून बरंच पाणी गेलं. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, ‘तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील’. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत. याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चोहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर आमचा जो निर्यय होईल तो जाहीर करू.”

सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा दुसरे अर्थमंत्री…

0
Newsworldmarathi Mumbai : Maharashtra Budget 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या (सोमवारी) सादर होईल. अर्थमंत्री अजित पवार तो सादर करतील. याआधी अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन अनोखा विक्रम करतील. अजित पवारांचा हा अकरावा अर्थसंकल्प ठरणार आहे. पण त्यांच्या पेक्षा जास्त अर्थसंकल्प हे शेषराव वानखेडे यांनी अर्थमंत्री म्हणून मांडले आहेत. त्यांना आतापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प मांडले आहे. त्यांच्यानंतर अजित पवारांचा नंबर लागतो. अजित पवारांचा हा 11 वा अर्थसंकल्प असेल. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी तब्बल 9 वेळा अर्थ संकल्प मांडला आहे. वानखेडे यांचे रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे. गेल्यावर्षीही अजित पवार यांनीच अर्थसंकल्प सादर केला होता. अजित पवार हे त्यांच्या आर्थिक शिस्त आणि कडक प्रशासकासाठी ओळखले जातात. गेल्या वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प हा एक व्यापक, क्रांतिकारी अर्थसंकल्प होता. त्या अर्थसंकल्पातील लोकाभिमुख, लोकप्रिय निर्णयांनी महाआघाडी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Maharashtra Budget 2025 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर, अजितदादाच्या पेठीत काय असणार घोषणा?

0
Newsworldmarathi Mumbai : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार हे 11 व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून आले. राज्याच्या तिजोरीची गंभीर स्थिती असल्याची चर्चा सुरू आहे. एका बाजूला आर्थिक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रिय घोषणा यामध्ये अर्थमंत्री अजित पवार कसा समतोल राखणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले.त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील अर्थ संकल्प हा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा असल्याने त्यावेळी अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. मात्र, त्याचा भार सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर पडला.

IND vs NZ Final न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान

Newsworldmarathi Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफी जिंकण्यासाठी महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे. गट टप्प्यातील सामन्यांनंतर हे दोन्ही आता दुसऱ्यांदा अंतिम फेरीत भिडणार आहे. याआधी भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.

स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पुण्यात संपन्न

0
Newsworldmarathi Pune : मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून, या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत. भूषण प्रधान, सायली पाटील, अशोक शिंदे आणि शिल्पा नवलकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.मुहूर्त सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती. चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी हा एक दमदार आणि उत्कंठावर्धक स्वप्नसुंदरी चित्रपट ठरणार असल्याची निर्मात्यांनी ग्वाही दिली आहे. स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त महिलादनिानिमित्त 8 मार्च 2025 रोजी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रेक्षकांना एक वेगळी कथा अनुभवायला मिळणार आहे.

अखेर कात्रज ते वेल्हे बससेवा सुरु; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

0
अखेर कात्रज ते वेल्हे कायम स्वरुपी बस सेवा सुरू झाली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पीएमपीएल कडून सुरुवातीला विंझर बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस वेल्हे पर्यंत सेवा सुरू झाली. पण एस टी कडून त्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे वेल्हेपर्यंतची सेवा बंद करण्यात आली. पीएमआरडीची हद्द पाबे गावापर्यंत बस सेवा सुरू होती. वेल्हे गावातील मेंगाई देवी यात्रा निमित्त प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा आठ दिवस सुरू करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायम स्वरुपी बस सेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली. या मागणीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला.अखेर कात्रज ते वेल्हे कायम स्वरुपी बस सेवा सुरू झाली त्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ग्रामस्थ, पर्यटक, विद्यार्थी, कामगार, व महिला कडून आभार मानण्यात आले.

पिंक रिक्षा चालक कष्टकरी महिलांना मिळाले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ

Newsworldmarathi Pimpri : महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महापालिका फेरीवाला समिती सदस्य व पिंक रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष सौ आशा बाबा कांबळे यांनी व्यक्त केला. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वेहिकल ऑटो एक्जीबिशन 2025 सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आशा कांबळे बोलत होत्या. या वेळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महिलांनी सुरुवातीला पिंक रिक्षाचे रॅली आयोजित केली, पिंपरी ते ऑटो कस्टर पर्यन्त हि पिंक रिक्षा रैली काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिका येथून जिम बँनसोन, जर्मनी येथुन क्रिस्तोफ स्प्रिंग,तसेच इंग्लंड, दुबई, जपान, व्हिएतनाम सह, दिल्ली राजस्थान, पंजाब, गुजरात, चेन्नई हैदराबादसह देशभरातील व प्रदेशातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक, टेम्पो, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय कष्टकऱ्यांचे नेते अध्यक्ष बाबा कांबळे, इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल के चेअरमन डॉ. एस. के. सरोज, अध्यक्ष डॉ.राजीव मिश्रा, डॉ दीपक वाधवा, श्रीनिवास कुमार, MSME केंद्र सरकार लघुउद्यो विभागाचे के.के.गोयल, डॉ कल्याण हट्टी, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, चंद्रकांत बराटे, संजय चव्हाण,आदी यावेळी उपस्थित होते. इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल या संघटनेचे चेअरमन डॉ. एस. के. सरोज म्हणाले की, ऑटोचा इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांच्या पुढाकाराने पुढे कार्य सुरू ठेवणार आहे. केंद्र शासनाने महिलांना इलेक्ट्रिक व्हेहिकलसाठी अनुदान द्यावे यासाठी केंद्र पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरवठा करू असे डॉ सरोज म्हणाले, आशा कांबळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काबाडकष्ट करणाऱ्या तसेच अत्यंत दुर्बल घटकातील 100 महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढून त्यांना शंभर रिक्षा देण्याचा उपक्रम घरकाम महिला सभा आणि बाबा सामाजिक फाउंडेशन या संयुक्त संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याला चार वर्षापेक्षा अधिक काळ होत आहे. कोविड काळामुळे ही योजना मध्यंतरी बंद होती. परंतु आता नव्याने पुन्हा ही योजना सुरू करून पिंपरी चिंचवड पुणे शहरातील एक हजार महिलांना पिंक रिक्षा योजनेमध्ये सहभागी करून त्यांना पिंक रिक्षा योजनेमध्ये स्वावलंबित करणार असल्याचे आशा कांबळे म्हणाल्या. ही योजना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र भरून नंतर देशभर वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मधुरा डांगे-( कष्टकरी कामगार पंचायत सरचिटणीस),ममता मनुरकर -( पिंपरी चिंचवड महापालिका नगरसदस्य,) सरोजा कुचेकर – (टपरी पथारी हातगाडी पंचायत महीला शहर अध्यक्ष,) कल्पना घाडगे-( टपरी पथारी हातगाडी पंचायत महिला उपाध्यक्ष,) एडवोकेट काजल कांबळे, यमुना काटकर, संगीता कांबळे, रेखा भालेराव, मनीषा माने, सारिका गलपलू,योगिता शिंदे, राणी तांगडे, वैशाली सोनवणे, आधी पिंक रिक्षा चालक महिला सहभागी झाल्या होत्या EV TECH INDIE EXPO वतिने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कंपनीचे डायरेक्टर मुकेश यादव, गणेश महाले, सतीश मांडोले, यांनी हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवला. या कार्यक्रमात चाकण हिंजवडी सह महाराष्ट्रातील उद्योजक, लघुउद्योग संघटनेचे प्रतिनिधी तसेच कंपनीचे डायरेक्टर व सी ओ आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणेकरांना आनंदाची बातमी! हा मेट्रो मार्ग होणार लवकरच सुरु…

0
Newsworldmarathi Pune : : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व जागा उपलब्ध झाल्या असून, आता या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. यांना १०० टक्के जागा हस्तांतरित केल्या आहेत. हा मेट्रो प्रकल्प २३.२०३ किलोमीटर लांबीचा असून, त्याची अंमलबजावणी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर करण्यात येत आहे. या प्रकल्पास ९ फेब्रुवारी २०१८ रोजी शासनाने मान्यता दिली होती. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळील २६३.७८ चौ.मी. जागा जीन्यासाठी आवश्यक होती. त्यासाठी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जागेच्या हस्तांतरणास मंजुरी दिल्याने आता मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जागा उपलब्ध झाली आहे.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा

0
Newsworldmarathi Pune : बुद्धम् शरणम् गच्छामि ॥ धम्मम् शरणम् गच्छामि॥ संघम् शरणम् गच्छामि .. च्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. बिहार मधील बूद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे. मात्र त्याचा ताबा बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे.  या गोष्टीचा जगभरातून निषेध होत असून  महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला. भदंत नागघोष महाथेरो, भंते राजरत्न, भंते बुद्धघोष थेरो, भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद, भंते यश, भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल आदी बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चातलाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची  सुरूवात झाली. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा मुक महामोर्चा मार्गस्थ झाला. भंते च्या हस्ते डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अलका चौकात सभा घेवून मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चाला संबोधीत करताना भंते राजरत्न म्हणाले, इ. स. पूर्व 563 पासून तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने त्यांच्या काळात ऐतिहासिक बौद्ध विहाराची निर्मिती केली आहे. मात्र आज त्या विस्तीर्ण बौद्ध विहाराच्या परिसरात अतिक्रमण करण्यात आले असून इतर देवी देवतांच्या नावाने तेथील विहार रूपांतरीत करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी महाविहार आहे त्याच्या उजव्या बाजूस बौद्ध मूर्तीं सापडून देखील तिथे  इतर देवी देवतांची मंदिर उभारली जात आहेत. तथागत भगवान गौतम बुद्धांची जन्मभूमी म्हणून आज जागतिक स्थरावर भारताकडे आदराने पाहिले जात. अन् आज त्याच देशात महाबोधी महाविहार मुक्तीसाथी जगभरात आनंदोलन केली जात आहेत. लोकं रस्त्यावर उतरली आहेत. ही भारतसरकारसाठी निंदनीय बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील भंते राजरत्न यांनी केली. भंते नागघोष म्हणाले, जगात बौद्ध धम्म बुद्धगया येथून प्रसारित झाला आहे, भारत देशाची ओळख जगात बुद्धभूमी अशी आहे. आपले पंतप्रधान, राष्ट्रपती  अन्य देशांच्या प्रमुखांना बुद्ध मूर्ती देतात. सम्राट अशोकाणे बांधलेले बुद्ध विहार  आपल्या ताब्यात नाही. बुद्धिस्ट टेंपल मॅनेजमेंट कामिटी मध्ये ९ पैकी ५ लोक हिंदू आहेत यामुळे तिथे हिंदूचे बहुमत आहे, त्या जोरावर तिथे कर्मकांड केले जाते. बुद्ध चरणी आलेल्या अनुयायांना मात्र कोणत्याही सुविधा मिळू शकत नाहीत, यामुळे जो पर्यंत १९४९ चा कायदा रद्द होणार नाही तो  पर्यंत महाविहार मुक्त होणार नाही. बिहार पोलिस आणि शासन तिथे बसलेल्या उपोषण करत असलेल्या भंते आणि बौद्ध अनुयायांवर दडपशाही करत आहे. श्रीलंकेतून आलेले भंते अनागारिक यांनी १८९१ साली सुरू केलेला महायबिधी महाविहार मुक्तीचा लढा १३५ वर्षे सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.  धम्म पालन गाथेने या विराट मोर्चाची सांगता झाली.

Pune Rape Case : नराधम दत्ता गाडेचे पोलीस वेषातील फोटो आले समोर..

Newsworldmarathi Pune : पुण्यातील स्वारगटे बस स्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे बाबत दिवसागणिक नवीन माहिती समोर येत आहे. नराधम गाडे स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, आता नवी माहिती हाती लागली आहे. दत्तात्रय गाडे याचा पोलिसी गणवेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलीसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमधे आढळलेला हा फोटो आहे. आपण पोलीस आहे अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, असे सांगत अनेक तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा. गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात फिरायचा. कधी पोलीस अधिकारी, कधी बस कंडक्टर असल्याचे भासवून त्यांनी अनेकांना लुटल्याची माहितीही समोर आली आहे.