माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार

Newsworldmarathi Delhi : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून अनेकांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शारदा सिन्हा, ओसामु सुझुकी यांच्यासह ७ जणांना पद्मविभूषण जाहीर झालेला आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण जाहीर करण्यात आलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवंगत गायक पंकज उधास यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोहर जोशी यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान लक्षणीय मानले जाते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच ते लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे ते शिवसेनेच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. दिवंगत गायक पंकज उधास यांनी गझल गायनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र छाप पाडली. त्यांच्या मधुर आवाजाने भारतीय संगीताला जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांची गाणी आजही संगीत प्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत. तसेच दिग्दर्शक शेखर कपूर यांना देखील पद्मभूषण जाहीर झाला आहे. १९ जणांना पद्मभूषण पुरस्कार घोषित झालेला आहे. पैकी तिघे जण महाराष्ट्राचे आहेत. एकूण १९ जणांना यंदा पद्मभूषण जाहीर झालेला आहे. एकूण ११३ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यात ११ जण महाराष्ट्रातील आहेत. यंदा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पद्म पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी एकूण १९ जणांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्यापैकी तीघे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी, दिग्दर्शक शेखर कपूर, दिवंगत गायक पंकज उधास – गझल गायनाच्या क्षेत्रातील अमूल्य योगदानंबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यापार, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा यामध्ये समावेश आहे. पद्मश्री पुरस्कारामध्ये अशोक सराफ हे अभिनय क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व आहेत, तर अश्विनी भिडे देशपांडे आणि जसपिंदर नरुला यांनी संगीत क्षेत्रात आपल्या गायनकौशल्याने ठसा उमटवला आहे. मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ओळखले जाते, तर राणेंद्र भानू मजुमदार बासरी वादन क्षेत्रातील एक आदरणीय नाव आहे. कृषीतज्ज्ञ सुभाष खेतूलाल शर्मा यांनी कृषी क्षेत्रात नवी दिशा दिली आहे, तर वासुदे कामत यांचे चित्रकलेतील योगदान महत्त्वाचे आहे. डॉ. विलास डांगरे यांचे कामही उल्लेखनीय आहे यामुळे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

पुणे: शहरातील नवले पुलावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिली. आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले असून उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पूल हा रहदारीचा रस्ता आहे. यावरून दिवस रात्र वाहनांची वर्दळ असते. अशातच शनिवारी पहाटे एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. पहाटे पाचच्या सुमारास एमएच १२ केडब्ल्यू ३६६३ ही स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि या बसला मागून जोरात ठोकली. कारचा वेग इतका होता की कारचा पुढचा भाग काहीसा बिघडला. या कारमधून प्रवास करणारे मित्रमंडळी हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी या चार जखमी युवकांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

खो-खो वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचे पुण्यात जंगी स्वागत

0
Newsworldmarathi pune : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. ही अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विजयी संघातील खेळाडूंचे पुण्यात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खेळाडूंच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करत विजयी रॅली काढण्यात आली. आमदार हेमंत रासने यांनी पुरुष संघाचा कॅप्टन प्रतीक वाईकर, खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा सत्कार करत अभिनंदन केले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथून विजयी रॅलीची सुरुवात झाल्यानंतर सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “खो-खोच्या पहिल्याच वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाच्या यशामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या विजयी संघामध्ये कसबा मतदारसंघातील अनेक खेळाडू असल्याचा अभिमान असून त्यांच्या कामगिरीने खो-खो या भारतीय पारंपरिक खेळाला जागतिक स्तरावर नवे महत्त्व मिळाले आहे. देशासाठी दैदिप्यमान करणाऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यापुढील काळात राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे”. कर्णधार प्रतीक वायकर म्हणाला, “कर्णधार म्हणून दडपण नव्हतं, पण देशवासीयांच्या अपेक्षांची जबाबदारी होती. वर्ल्ड कप आपल्याच देशात असल्याने जिंकायचं होतं, आणि फायनलमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा आनंद आहे. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आम्ही तयार आहोत. खो-खो ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून शाळांमध्ये आणि अकादमींमध्ये या खेळाचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.” यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी,सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे यांच्यासह सर्व मा नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याचे महापौरपद आऱपीआयला मिळावे : केंद्रीय राज्यमंत्री आठवले

0
Newsworldmarathi Pune : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबल्या आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका पार पडतील अशी शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीत मागच्या वेळी आम्हाला 5 जागा मिळाल्या होत्या. आता महायुती असली तरी यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोणकोण भाजप सोबत राहतील यात शंका आहे. मात्र आरपीआय हा भाजपचा मूळ मित्रपक्ष असल्याने आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महापौर पद अनुसूचीत जातीसाठी आरक्षित असल्यास ते आरपीयआय ला मिळावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. व्हीआयपी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, शैलेश चव्हाण, विरेन साठे, श्याम सदाफुले, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, विशाल शेवाळे, उमेश कांबळे यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुढे बोलताना आठवले म्हणाले, पुणे शहरात जागोजागी आमच्या शाखा आहेत. त्यामुळे भाजप ने जरी स्वबळाचा नारा दिला तरी त्यांना पुणे महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आमच्या शिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुकीतही भाजप सोबतच राहणार आहोत. तसेच महायुती मध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून वाद सुरू असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश मार्गी लावतील असे सांगत, राज्य मंत्रिमंडळात जी एक जागा रिक्त आहे त्याजागेवर आरपीआय ला मंत्रिपद द्यावे अशी मागणीही आठवले यांनी केली.

माजी खासदाराच्या मुलाच्या आत्महत्येने खळबळ

Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यातून राजकारणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी माजी खासदाराच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अजून समोर आलं नाही. मंचर येथील माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव विकास बाणखेले यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंचर पोलिसांनी रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुमित मोरे करत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत माहिती अशी की, विकास किसनराव बाणखेले सकाळी गावात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. तेव्हा सगळं काही ठीक होतं. नंतर ते जेवणासाठी साडेअकरा वाजता आले नसल्याने त्यांचे बंधू बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. नंतर मात्र आवाजाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता विकास यांनी एका वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचलले याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. घटनास्थळी मंचर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येबाबत कोणते आर्थिक किंवा इतर कारण होते का? असा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र एकच धक्का अनेकांना बसला आहे.

‘जीबीएस’ आजारावर त्वरित उपाययोजना करा; काँग्रेसची मागणी

0
Newsworldmarathi Pune : पुण्यात दूषित पाण्यामुळे वाढणाऱ्या Guillain-Barré Syndrome (GBS) च्या प्रकरणांवर त्वरित मोफत उपचार व जलप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली महापालिका आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः सिंहगड रोड आणि परिसरातील ग्रामीण भागांमध्ये दूषित पाण्यामुळे Guillain-Barré Syndrome (GBS) या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत 67 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, त्यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दूषित पाण्यात norovirus आणि campylobacter bacteria आढळल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या स्थितीत त्वरित आणि प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सर्व रुग्णालयांमध्ये GBS रुग्णांसाठी मोफत उपचार व औषधोपचाराची तातडीने व्यवस्था करावी, उपचारासाठी लागणाऱ्या IVIG डोस आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, दूषित पाण्याचा मूळ स्त्रोत ओळखण्यासाठी त्वरित जलतपासणी मोहीम हाती घ्यावी, नियमितपणे प्रभावित भागातील पाणीपुरवठा यंत्रणेचे निरीक्षण करावे, जलप्रदूषणासाठी जबाबदार व्यक्ती, संस्था किंवा कारखान्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत आवश्यक पावले उचलावीत, दूषित भागांमध्ये नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सेवा उपलब्ध करून द्यावी, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन व फिल्टर सुविधा नागरिकांना वितरीत कराव्यात, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी या शिष्टमंडळात युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, ओबीसी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत सुरसे, पीएमटी चेअरमन शेखर कपोते, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सचिव चेतन अग्रवाल, अनिकेत सोनवणे उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी संदर्भातली तपासणी करून योग्य त्या सूचना करण्याचे त्वरित अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ असे अश्वस्थ केले.

मराठी बाल साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने सुरुवात

0
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची ग्रंथदिंडीने दिमाखदार सुरुवात झाली. चाळकवाडी लगतच्या महामार्गापासून सुरू झालेली ग्रंथदिंडी गावातून फिरून कविवर्य ग. ह. पाटील बालसाहित्य नगरीत (संमेलनस्थळी) आली. महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‌‘ज्ञानदेव-तुकाराम‌’ नामाचा गजर करत ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांनी ‌‘वाचन संस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी‌’, ‌‘ग्रंथ हेच गुरू‌’, ‌‘जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक‌’, ‌‘ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या, अंधाराच्या राती‌’ असे फलक घेऊन वाचन संस्कृतीचा जागर केला. विद्यार्थ्यांच्या लेझीम-ढोल पथकाचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन झाले. शिवांजली प्राथमिक विद्यालय, शिवांजली विद्यानिकेतन, शिवाजी विद्यार्थी वसतीगृह, न्यू इंग्लिश स्कूल, आंबोडी, मारोतराव लांडगे विद्या निकेतन, कळंब, जि. प. प्राथमिक शाळा, चाळकवाडी, कोळवाडी, पिंपळवंडी, सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी, विशाल जुन्नर सेवा मंडळ शैक्षणिक संकुल, कांबळी या शाळांमधील विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत सहभाग होता. संमेलनस्थळी ध्वजारोहण संमेलनाध्यक्ष सूर्यकांत सराफ, अनिल मेहेर, शरद लेंडे, माधव राजगुरू, अनिल कुलकर्णी, सुनील महाजन, श्रीकांत चौगुले, संजय ऐलवाड, राजेंद्र चौगुले, मुरलीधर साठे, अशोक सातपुते, सचिन बेंडभर, मुरलीधर साठे, मुकुंद आवटे, एकनाथ आव्हाड, मिलिंद कसबे, अनिल काकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनस्थळी ध्वजारोहण झाले. आत्मनिर्भरतेसाठी शिक्षण-साहित्य आवश्यक ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात अनिल मेहेर म्हणाले, साहित्यकलेचा आविष्कार, अभिरूची व्यक्त केली जाते त्यामागे साहित्यिकाची विशिष्ट भूमिका असते. राष्ट्र उभारणीसाठी, आत्मनिर्भरता मिळविण्यासाठी शिक्षणाची व त्याला जोड म्हणून साहित्याची आवश्यकता आहे. बालसाहित्याविषयीची रुची मुलांमध्ये वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बालसाहित्यिक, बालकवी मुलांच्या मनावर संस्कार करत असतात, त्यांची जडणघडण करण्याचे कार्य करीत असतात. संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी भाषा आणि साहित्याची जपणूक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी साहित्य चळवळ राबवावी. प्रास्ताविक माधव राजगुरू यांनी केले. आभार शरद लेंडे यांनी मानले. सुरुवातीस भोसले आणि मंडळींनी समतेचा गोंधळ सादर केला. सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले. फोटो ओळ : ग्रंथदिंडीच्या शुभारंभप्रसंगी संमेलनाध्यक्ष व संस्थेचे पदाधिकारी.

ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचे निधन

0
Newsworldmarathi Pune :मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी (ता. २३) रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांच्यामागे दोन कन्या,जावई,नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनानं पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीनं मांडणारा तसंच शेतकरी, कष्टकरी बांधवांशी नाळ जुळलेला, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी समरस झालेला, लढाऊ पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांनी सात दशकांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेसाठी योगदान दिलं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचा विशेष स्नेह होता. रामभाऊ जोशी यांच्या निधनानं ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशी भावना अजित पवार यांनी ज्येष्ट पत्रकार जोशी यांच्या निधनावर व्यक्त केली आहे. रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांची कारकिर्द परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले. पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव मध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या इमारतीसाठी त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी सन १९५० मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला आणि त्यानंतर पुणे येथे सायं. दैनिक ‘लोकराज्य’, दै. संध्या, दैनिक केसरीत उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक, अशा विविध पदांवर काम केले. १९६५ च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी ते केसरीचे प्रतिनिधी म्हणून पंजाबमध्ये दाखल झाले होते. तसेच, बांगला युद्धाच्या वेळी त्यांनी कलकत्त्याकडे धाव घेतली होती. अहमदाबाद, जळगाव, भिवंडी, औरंगाबाद, मुंबई वगैरे ठिकाणी जेथे जेथे जातीय दंगली उसळल्या तेथे प्रत्यक्षात जाऊन पत्रकारितेची भूमिका चोखपणे पार पाडली होती. यासोबत त्यांनी पत्रकार संघटनांच्या कार्यातही आपला सहभाग नोंदवला होता. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सलग चार वर्षे अध्यक्ष, तसेच इंडियन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट या अ.भा.संघटनेच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

न्याती ग्रुपसोबत करा कल्याणीनगरमध्ये लक्झरी आयुष्याची सुरुवात

0
Newsworldmarathi Pune : पुण्यातील बहुमानांकीत रिअल इस्टेट ब्रँड, न्याती ग्रुपने १९ जानेवारी रविवार रोजी, कल्याणी नगरामध्ये, बहुप्रतीक्षित आलिशान निवासी प्रकल्प न्याती इवोकचे अनावरण केले. या भव्य उद्घाटन समारंभाने प्रत्येक संवेदनांना मोहित करत, एक नेत्रदीपक सोहळा साकारला. प्रतिष्ठित व्यावसायिक, प्रभावशाली राजकीय नेते, प्रसारमाध्यमातील दिग्गज आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकींच्या सहभागाने हा कार्यक्रम उजळून निघाला. सदर कार्यक्रम हा बोहो थीमवर आधारित होता. पाहुण्यांचे स्वागत लाईव मोहक व्हायोलिन वादनाने करण्यात आले, जे नंतर पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा उत्कृष्ट समन्वय सादर करत एका जोशपूर्ण डीजेच्या तालांमध्ये रुपांतरित झाले. पाककृतींच्या दृष्टिकोनातूनही या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रभावित केले, ज्यामध्ये उत्कृष्ट डेझर्ट, हाय-टीचे पदार्थ आणि मॉकटेल्सच्या रूपाने एक अप्रतिम मेजवानी होती. न्याती इवोकमध्ये आपले स्वप्नातील घर विकत घेणाऱ्या लोकांचे स्वागत न्याती इवोकचे भावी रहिवाशांच्या रूपात केल्याने तसेच आपल्या इतर भावी शेजाऱ्यांना भेटल्याने काही भावनिक क्षण निर्माण झालेत. न्याती ग्रुपच्या कम्युनिटी-फर्स्ट तत्त्वज्ञानाचा हा सुंदर पुरावा होता. कृतज्ञतेच्या भावनेने आणि प्रेरणेने, प्रत्येक बुकिंग गिफ्ट पाच संवेदनांवर आधारित थीमला अनुसरून विचारपूर्वक तयार करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण प्रसंगी अध्यक्षस्थानी न्याती ग्रुपचे दिग्गज होते – डॉ. नितीन न्याती, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक; श्री. हरीश श्रॉफ, विक्री, विपणन आणि व्यवसाय विकास संचालक; आणि श्री. प्रणव न्याती, कार्यकारी संचालक. एकत्रितपणे, त्यांनी शांतता आणि भव्यतेच्या सुसंवादाचे प्रतीक असलेल्या न्याती इव्होक प्रकल्पासाठी त्यांचे दृष्टिकोन सामायिक केले. न्याती इवोक, न्याती ग्रुपच्या समृद्ध पोर्टफोलिओतील एक अनमोल रत्न आहे, जे आलिशान जीवनशैलीची नवी व्याख्या निर्माण करते. दोन २७ मजली गगनचुंबी इमारतींचा समावेश असलेल्या या गेटेड कम्युनिटीत प्रति मजला केवळ चार अपार्टमेंट्स उपलब्ध आहेत, जे खाजगीपणा आणि विशेषत्व सुनिश्चित करतात. कल्याणी नगरातील शांत परिसरात वसलेले हे आश्रयस्थान आहे, जे तुमच्या संवेदनांना जागृत करण्यासाठी आणि मनाला शांतता प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. २७+ वर्षांची समृद्ध परंपरा, ६८+ भव्य प्रकल्प, आणि १४,०००+ कुटुंबांना आलिशान जीवनशैली देणाऱ्या न्याती ग्रुपने रिअल इस्टेट क्षेत्रात अतुलनीय मापदंड स्थापित केले आहेत. न्याती इवोक फक्त एक घर नसून, एक अनुभव, एक आश्रयस्थान, आणि एक उत्कृष्ट नमुना आहे, जो आलिशान जीवनशैलीचे नवे परिमाण सादर करतो. न्याती इवोकच्या अनावरणासह, न्याती ग्रुपने पुन्हा एकदा वास्तुकलेच्या उत्कृष्टतेसह बेजोड आलिशानतेचे प्रतीक निर्माण करण्याची आपली निष्ठा दाखवली आहे. हा प्रकल्प केवळ निवासी प्रकल्प नसून, एका परिष्कृत जीवनशैलीकडे जाण्याचा मार्ग आहे – जिथे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक डिझाइन केली गेली आहे. न्याती इवोक जिथे स्वप्नांना त्यांचे परिपूर्ण घर मिळते, आणि उत्कृष्ट जीवनशैलीची नवी कहाणी सुरू होते.
Oplus_131072

मराठी माणसाच्या नादाला लागू नका : उद्धव ठाकरे

0
Newsworldmarathi Mumbai : “मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है?” असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह परत उद्या येताय त्यांचा समाचार तर घेणार,मी सोडणार नाही.पाठीत वार केला की वाघ नखं आम्ही काढू..मिठी मारली तर प्रेमाने मारू दगाबाजी केली तर वाघनखं काढू…1978  साली पुलोदच्या दग्गाबाजीमध्ये भाजप सुद्धा होता… त्याला खतपाणी तुम्ही दिला त्यात चेंबूरचे हशू अडवणी सुद्धा होते. दग्गाबाजीचे बीज तुमच्यात आहेत अमित शाहजी..90 हजार RSS चे लोकं आता कामाला येणार आहे का? तो रक्तदान करेल कीं गोमूत्र दान करेल? असा सवालही उद्धव ठाकरे म्हणाले पहिली पोटनिवडणूक 1987 साली लढली, ती देशातील हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढलेली पहिली निवडणूक होती. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने होते. गुजरातमधून शंभू महाराज होते. त्यावेळी बाळासाहेबांची स्पष्ट भूमिका आहेत. पाकिस्तान धार्जिणा मुस्लिम आमचा नाही.